Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sonia gandhi health update : सोनिया गांधींची प्रकृती बिघडली! रुग्णालयात दाखल; 'हे' आहे मोठे कारण

Sonia gandhi health update admitted to sir gangaram hospital delhi : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना दिल्लीतील नामांकित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Sonia gandhi health update

प्रकृती बिघडण्याचे मुख्य कारण काय?

वनइंडियाच्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांना जुनाट खोकला आणि दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होत आहे. ७९ वर्षीय सोनिया गांधी यांना चेस्ट फिजिशियनच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती 'स्थिर' असून काळजी करण्याचे कारण नाही. काही वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून श्वसनविकाराने त्रस्त आहेत. यापूर्वी जून २०२५ मध्येही त्यांना पोटाच्या विकारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील कडाक्याची थंडी आणि हवेची ढासळलेली गुणवत्ता लक्षात घेता, डॉक्टर अधिक खबरदारी घेत आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले नसले तरी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये जेव्हा सोनिया गांधी शिमल्याच्या आल्हाददायक वातावरणात होत्या, तेव्हाही त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना तातडीने 'इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज' मध्ये नेण्यात आले होते. तिथे सर्व काही सामान्य असल्याचे सांगत त्यांना डिस्चार्ज मिळाला खरा, पण दिल्लीतील वाढत्या हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि सध्याच्या गारठ्याने चिंता वाढली आहे. म्हणूनच, ७९ व्या वर्षी सोनिया गांधींबाबत आता अधिक खबरदारी घेतली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+