लग्नाच्या दुसऱ्याच दिवसांपासून सोनमचे प्रियकराशी चॅटींग! तिसऱ्या दिवशी पती राजाच्या हत्येचा कट, वाचा
Sonam Raghuvanshi chatting with her boyfriend : इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी हत्याकांड देशभर गाजत आहे, हनीमूनला गेल्यानंतर तिथे राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून सोनमसह तिचा प्रियकर राज आणि राजा रघूवंशीची सुपारी घेणाऱ्या तीन मारेकऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि चॅट्स तपासले जात आहेत. आता या प्रकरणात अनेक गोष्टींची उकल होत आहे.

सोनम प्रियकराला म्हणाली- पती माझ्याशी जवळीक साधतोय..
वन इंडिया हिंदीनुसार, सोनमचे ज्या दिवशी राजा रघुवंशीसोबत लग्न झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तिने तिचा प्रियकर राजसोबत चॅटिंग सुरू केली होते. तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून असे दिसून आले आहे की, तिने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी राजसोबत त्याला मारण्याचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, तिने तिचा प्रियकर राजाबद्दल सांगितले होते की तो माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे, सोनम रघुवंशीच्या चॅटमधून खुलासे झाले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सोनम रघुवंशीने लग्नानंतर तिचा प्रियकर राजशी चॅटवर खूप बोलले होते. यादरम्यान, तिने राजाबद्दल सांगितले होते की तो जवळीक साधू इच्छितो. मला हे सर्व अजिबात आवडत नाही.
लग्नानंतर पतीलाच मारण्याचा कट
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर राजाला मारण्याच्या उद्देशाने सोनमने शिलाँगला जाण्याचा संपूर्ण प्लॅन बनवला होता. हनिमूनला जाण्यापूर्वी तिने राजसोबत खूप प्लॅनिंगही केले होते. एवढेच नाही तर हॉटेलच्या मुक्कामापासून ते लोकेशनपर्यंतची सर्व माहिती ती राजला देत होती.
प्रेयसी सोनमच्या लग्नात होता प्रियकर राज
राज कुशवाहा सोनम आणि राजाच्या लग्नाला उपस्थित होता. पोलिस तपासात राजा आणि सोनमच्या लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये राज कुशवाहा दोघांच्या लग्नाला उपस्थित असल्याचे दिसून येते. सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, राज आणि सोनम अनेकदा कारखान्यात भेटत असत आणि बऱ्याचदा दोघेही बाहेरही जात असत.
राज करायचा सोनमच्या माहेरी काम
माध्यमांशी बोलताना सोनमच्या वडिलांनी सांगितले की, राज त्यांच्या घरी म्हणजेच सोनमच्या माहेरी काम करायचा. कारखान्यात काम केल्यामुळे तो कुटुंबातील सदस्यांशी परिचित होता. राज सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान असून तिच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात तो बिलिंग आणि व्यवस्थापनाचे काम पाहत असे. राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. शिलाँग पोलिस या पाचही जणांची चौकशी करत आहेत.












Click it and Unblock the Notifications