'या' प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आढळला मृतदेह; कशी झाली हत्या?
social media influencer Kamal Kaur Bhabhi : पंजाबमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कमल कौर भाभी उर्फ कांचन कुमारी हीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे.
भटिंडा येथील हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये कारमध्ये तिचा मृतदेह आढळला असून सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात तिला ठेवण्यात आलेले असून तिचा हत्या कशी झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कोण आहे कमल कौर?
कमल कौर लुधियानाची रहिवासी होती. ती अनेकदा इंस्टाग्रामवर वादग्रस्त आणि अश्लील रील्स बनवत होती. तिचे इंस्टाग्रामवर 3.86 लाख फॉलोअर्स आहेत. 7 महिन्यांपूर्वी दहशतवादी अर्श डल्लानेही अश्लील कंटेंटवरून कमल कौरला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तर आता तिचा मृतदेह आढळून आला.

जेव्हा दुर्गंधी आली तेव्हा झाले उघडकीस
सहारा जन सेवा संस्थेचे सेवक संदीप सिंग यांनी बुधवारी रात्री पोलिसांना फोन केला. बटिंडा-बरनाळा रोडवरील आदेश हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक कार उभी असल्याचे सांगण्यात आले, ज्यातून तीव्र उग्रट वास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा तिथे एक इऑन कार उभी होती. कारच्या आत एका महिलेचा मृतदेह होता, जो बऱ्याच काळापासून तिचा मृत्यू झालेला असल्याचे दिसून आले. तसेच कार लॉक होती. कारचे लॉक उघडले. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. मृतकाजवळ एक पर्स आणि बॅग सापडली, पण त्यात कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत.
खून दुसरीकडे झाल्याचा पोलिसांचा दावा
घटनास्थळी पोहोचलेले पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कळले की ही कार मंगळवारपासून येथे उभी आहे. त्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यांची टीम सर्व बाजूंनी तपास करत आहे. ही महिला मध्यमवयीन आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. असे दिसते की ही हत्या दुसरीकडे कुठेतरी झाली आहे आणि मृतदेह येथे आणून सोडण्यात आला आहे.
डल्ला म्हणाला होता - कोणी मेले तरी काही फरक पडणार नाही
साधारण सात महिन्यांपूर्वी दहशतवादी अर्श डल्लाचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो कमल कौरला धमकी देत होता की ही मुलगी सोशल मीडियावर खूप घाण टाकते.
यामुळे पंजाबची तरुणाई बिघडत आहे. तिच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा मृत्यू झाला तरी काही फरक पडणार नाही. वादळ येणार नाही.












Click it and Unblock the Notifications