Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रसिद्धी बेतली जिवावर! रील स्टार होण्यासाठी त्यानं सापाला धरलं तोंडात, गेला जीव! व्हिडिओ व्हायरल!

snake bite Reels Star Death : रातोरात प्रसिद्ध होण्यासाठी किंवा सोशल मीडियावर स्टार झालो तर बक्कळ पैसे येतील, या हव्यासापोटी अनेक तरुण जीव धोक्यात घालत रील बनवत आहे. हे प्रकार हल्ली वाढले आहेत. पण त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवावर बेतू शकतं..

होय आम्ही म्हणतोय ते खरं आहे, असाच एक धक्कादायक प्रकार तेलंगणात घडला. एका रील स्टारने साफ तोंडात घेत शॉर्ट व्हिडिओ बनवला. पण, त्याला साप चावल्यानं त्याचा काहीच तासांत मृत्यू झाली. या व्हिडिओमुळे हा तरुण व्हायरल झाला खरा पण त्यासाठी त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

snake bite Reels Star Death

नेमके काय घडले? काय आहे व्हिडिओत

हा व्हिडिओ तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचं नाव शिवराज होतं. व्हिडिओमध्ये शिवराज हात जोडून उभा आहे अन् त्याच्यामध्ये तोंडामध्ये एक भला मोठा साप आहे. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे.

शिवराजच्या बाजूलाच एक दुसरा मुलगा दिसत आहे. तो व्हिडिओ शूट करत आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलाय. ती व्यक्ती कॅमेऱ्यात दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध उभा राहून शिवराज हा स्टंट करत आहे. त्याच्या तोंडात कोब्रा साप असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिवराज स्टाईल मारताना देखील दिसत आहे. तो आपले केस मागे घेऊन आपण 'हिरो' असल्याचं सूचवतो.

सापानं‌ घेतला चावा

स्टंट दरम्यान काही वेळानंतर हाच साप शिवराजला चावला आहे. त्यानंतर काही तासांनी त्याचा मृत्यू झालाय. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी किंवा काही फॉलोवर्स मिळवण्यासाठी तरुण आपला जीव कसा धोक्यात घालत आहेत याचं हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे स्टंट करणे हे धोकादायक असते. त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे स्टंट न करण्याच आवाहन प्रशासन करत आहे.

शिवराजचे वडील गारुडी

तेलगू स्क्राइब या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज आणि त्याचे वडील सापांना मारून आपली उपजीविका चालवितात. हा नाग या बाप-लेकांनीच पकडला होता. तसेच वडिलांच्या सांगण्यावरून शिवराजने नागाला तोंडात धरून रील बनवायला घेतलं. मात्र व्हिडीओ संपवून नागाला तोंडातून बाहेर काढताना नागाने शिवराजला दंश केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+