Big News:छत्तीसगढचे 16 आमदार छत्रपती संभाजीनगरात! महाराष्ट्रातील निवडणुकीची रणनीती की आणखी काही वाचा
MLAs of Jharkhand In Sambhajinagar : आगामी महाराष्ट्रातील विधासभा निवडणुकीच्या अनुशंगानं भाजपनं कंबर कसली आहे. त्यातच काल रात्री छत्रपती संभाजीनगर छत्तीसगढचे 16 आमदार दाखल झाले असून ते राज्यातील निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांना मदत करणार आहेत असे सुत्रांनी सांगितले.
काल रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरातील दोन हॉटेलमध्ये झारखंड 16 आमदार मुक्कामी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून, हे आमदार छत्रपती संभाजीनगरात का आले, याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. सगळेच पक्ष तयारीला लागले. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ सरळ लढत असेल. त्यातच आता काल रात्रीपासून परराज्यातील भाजपचे 16 आमदार, प्रमुख पदाधिकारी एकाच वेळी शहरात आल्याने मोठी उलथापालथ होणार हे निश्चित आहे. परंतु, हे आमदार का आले हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, भाजप मोठी रणनीती ठरवत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीची रणनीती की...
राज्यातील विभागवार तयारीच्या अनुषंगाने भाजपने मराठवाड्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून छत्तीसगढ येथील भाजपाचे तब्बल सोळा आमदार छत्रपती संभाजीनगर येथे रात्रीपासून आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, छत्तीसगढचे आमदार महाराष्ट्रातील राजकारणावर काय चर्चा करणार, हा प्रश्न आहे. या आमदारांसोबत भाजपाचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील आहेत.
अशी केली व्यवस्था
शहरातील दोन मोठ्या हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये निवास तर दुसऱ्या हॉटेलमध्ये बैठकीची व्यवस्था आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी समीर राजूरकर आणि अहमदनगर येथील प्रकाश गांधी येथील समन्वयक आहेत.
महाराष्ट्राची जबाबदारी देणार?
भाजपाने मराठवाड्यातील विधानसभेच्या 25 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवर विजय कसा मिळवायचा यावरच या बैठकीत खल होणार असल्याचे कळते. बैठकीत उपस्थित झारखंड, छत्तीसगडमधील आमदार आणि भाजपा पदाधिकारी यांना या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असून त्यांच्यासोबत देखील या सर्वांची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications