kangana ranaut :'कंगना राणावतला रेपचा अनुभव!' सिमरनजीत सिंग मान यांची वादग्रस्त वक्तव्य!
kangana ranaut : संगरूर, पंजाब आणि शिरोमणी अकाली दल भाजपचे माजी खासदार तथा नेते सिमरनजीत सिंग मान यांनी गुरुवारी, 29 ऑगस्ट रोजी भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. सिमरनजीत सिंग मान यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी खासदार मान यांची ही टिप्पणी कंगना राणावतने शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान 'बलात्कार' झाल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी आली आहे. सिमरनजीत सिंग यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रियाही येत आहेत.

काय आहे सिमरनजीत यांचं वादग्रस्त वक्तव्य?
वृत्तानुसार, सिमरनजीत सिंह मान म्हणाले की, तुम्ही कंगना राणावतला बलात्कार कसा होतो, हे विचारू शकता जेणेकरून लोकांना बलात्कार कसा होतो हे समजावून सांगता येईल. कंगना राणावतने शेतकऱ्यांच्या निषेधावर केलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया म्हणून मान यांची ही टिप्पणी आली आहे. खरे तर 2019 ते 2020 पर्यंत शेतकरी आंदोलन झाले जे जवळपास वर्षभर चालले.
कंगना राणावतचे ते वादग्रस्त वक्तव्य..
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन बरेच महिने चालले. या आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणावतने (kangana ranaut) निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला जात असल्याचा दावा केला होता.तेथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते असे वक्तव्य केले होते. याशिवाय भारताचे नेतृत्व मजबूत नसते तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेशसारखे संकट ओढवले असते, असेही कंगना रणावत म्हणाली. या निदर्शनांशी संबंधित कटात चीन आणि अमेरिका सामील असल्याचा आरोप तिनं केला होता.
कंगनाच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका काय होती
कंगना रानावत हिनं जे वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपने सावध प्रतिक्रीया दिली होती. भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून दुर जात ही पक्षाची भूमिका नसल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांचं ते वैयक्तिक वक्तव्य असल्याचंही स्पष्ट केलं. त्याचवेळी विरोधी पक्षांनी कंगना रानावत(kangana ranaut) हिच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यान आता सिमरनजीत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चेत आले आहे.












Click it and Unblock the Notifications