Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर 'काश्मीर टाइम्स'वर SIAची मोठी कारवाई; AK-47 जप्त, 'पत्रकारिते'वर हल्ला?

SIA Raids Kashmir Times Office : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (१० नोव्हेंबर २०२५) घटनेनंतर अवघ्या दहा दिवसांनी जम्मू आणि काश्मीरमधील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी घटना घडली आहे.

गुरुवारी (२० नोव्हेंबर २०२५) जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने (SIA) काश्मीर टाइम्स वृत्तपत्राच्या जम्मू येथील मुख्यालयावर छापा टाकला आहे.

या छाप्यात एके-४७ रायफलची काडतुसे, जिवंत पिस्तूलची काडतुसे आणि हँडग्रेनेड पिना जप्त करण्यात आल्याचा दावा एसआयएने केला आहे.

ही कारवाई वृत्तपत्र आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध "राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन दिल्याबद्दल" दाखल केलेल्या एफआयआर अंतर्गत करण्यात आली आहे.

SIA Raids Kashmir Times Office

कार्यालयात शस्त्रास्त्रांचे भाग जप्त: एसआयएचा दावा

एसआयए (SIA) टीमने रेसिडेन्सी रोडवरील दुमजली कार्यालयात सकाळी ६ वाजता छापा टाकला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी इमारतीला वेढा घातला होता. यावेळी एके-४७ रायफल काडतुसे, पिस्तूलच्या जिवंत काडतुसे आणि ग्रेनेड पिन जप्त करण्यात आले.

एफआयआर क्रमांक ०२/२०२५ हा बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) कलम १३ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. वृत्तपत्रावर "देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध साहित्य पसरवण्याचा" आरोप आहे.

एसआयएची भूमिका काय?

एसआयएचे म्हणणे आहे की कोणताही व्यासपीठ देशद्रोह किंवा फुटीरतावादाला प्रोत्साहन देऊ शकत नाही. वृत्तपत्राचे प्रवर्तक - संपादक अनुराधा भसीन जामवाल आणि प्रबोध जामवाल - यांची येत्या काही दिवसांत चौकशी होण्याची शक्यता आहे. हे दोघेही सध्या परदेशात आहेत. काश्मीर टाइम्सची प्रिंट आवृत्ती २०२१-२२ पासून बंद आहे, परंतु वृत्तपत्र ऑनलाइन सक्रिय आहे.

"सत्यावर हल्ला झाला, गप्प राहणार नाही; संपादकांचा निषेध!

एसआयएच्या या कारवाईचा आणि आरोपांचा काश्मीर टाइम्सच्या संपादकांनी तीव्र निषेध केला आहे. ज्येष्ठ पत्रकार अनुराधा भसीन जामवाल (कलम ३७० साठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील) आणि प्रबोध जामवाल यांनी संयुक्त निवेदन जारी केले. हा छापा स्वतंत्र पत्रकारिता शांत करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. सरकारवर टीका करणे शत्रुत्वपूर्ण नाही. लोकशाहीसाठी मजबूत पत्रकारिता आवश्यक आहे."

आरोप मागे घेण्याची मागणी

"हे आरोप धमकावण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी आहेत. आम्ही गप्प राहणार नाही." त्यांनी अधिकाऱ्यांना एफआयआर मागे घेण्याचे आणि छळ थांबवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले, "राज्य कार्यालयांवर छापे टाकू शकते, परंतु सत्याशी आमची प्रतारणा केलेली नाही. पत्रकारिता गुन्हा नाही, या भूमिकेवर ते ठाम आहेत.

काश्मीर टाइम्सचा काय आहे इतिहास?

१९५४ मध्ये ज्येष्ठ पत्रकार वेद भसीन यांनी 'काश्मीर टाइम्स'ची स्थापना केली होती. वृत्तपत्राने काश्मीर मुद्द्यांवर सरकारवर सातत्याने टीका केली आहे आणि अनेक वर्षांपासून ते फुटीरतावाद्यांचे समर्थक मानले जात होते. वेद भसीन यांचे नाव दीर्घकाळ चाललेल्या गुलाम नबी फई दहशतवादी सेमिनार वादाशी जोडले गेले होते.

राजकीय प्रतिक्रिया: दबावाखाली कारवाई नको!

उपमुख्यमंत्री सुरिंदर सिंग चौधरी यांनी या विषयावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "जर चुकीचे काम सिद्ध झाले तर कारवाई केली जाईल, दबावाखाली नाही." पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक्सवर (माजी ट्विटर) यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. "काश्मीर टाइम्स सत्य बोलते, ते दबावापुढे झुकत नाही. देशविरोधी गैरवापर करून सत्य दाबणे हा अन्याय आहे. आपण सर्व देशविरोधी आहोत का?"

दहशतवादी मॉड्यूल ऑपरेशनचा भाग

हा छापा १० नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एसआयए-एनआयए (SIA-NIA) ऑपरेशन्सचा एक भाग आहे, जो दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलवर केंद्रित आहे. काश्मीरमध्ये देशद्रोहाच्या मजकुरावर क्रॅकडाऊन वाढला आहे.

काश्मीर टाइम्सवर झालेले हे आरोप आणि जप्तीचे प्रकरण पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे. एका बाजूला शस्त्रास्त्रांचे भाग जप्त केल्याचा एसआयएचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला संपादकांचा 'सत्य दाबण्याचा प्रयत्न' असल्याचा आरोप आहे. हे आरोप सिद्ध होतात का आणि यातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+