Shravan 2025 : श्रावण महिन्यात भगवान शंकराला रुद्राभिषेक कधी करावा? या आहेत शुभ तारखा
Shravan 2025 Rudrabhishek to Lord Shiva Auspicious dates : चैत्र महिन्यापासून सुरु होणाऱ्या मराठी वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण.. या महिन्यात हिरवळीने सारी धरती नटलेली जशी असते अगदी तसाच हा महिना सणउत्सव आणि उपवासाने भरलेला आहे. या महिन्यात श्रावण सोमवार, श्रावण शनीवार उपवासापासून तर विविध सण येतात.
श्रावण महिन्याचे एक आगळेवेगळे अधिष्ठान आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व मानले जाते. या वर्षी श्रावण ११ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे, जो ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत असेल. तसे पाहता सोमवार हा भगवान शिवाचा वार पण श्रावण पुर्ण महिनाच एवढा पवित्र आहे की, प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पुजा आणि उपवास केले जातात.

असे मानले जाते आणि धारणा आहे की, या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्याने शुभ फळे मिळतात. श्रावनमध्ये भगवान शिवाची आराधना करणे खूपच समाधान देणारे आणि भक्तिमार्गातील व्यक्तींसाठी विशेष महत्वाचे असते. या महिन्यात रुद्राभिषेकाला फार महत्व आहे.
रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवांना दुध-दह्यापासून विशिष्ट वस्तूंनी स्नान करण्याची प्रक्रिया, यामुळे केवळ पुण्य प्राप्ती होत नाही तर दुःख, वेदना आणि अडथळ्यांपासून देखील मुक्तता मिळते असे मानले जाते. जर तुम्ही सावन २०२५ मध्ये रुद्राभिषेक करण्याचा विचार करत असाल, तर काही तारखा खास आहेत ज्या आम्ही येथे देत आहोत.
रुद्राभिषेक शुभतारखा
- श्रावणातील पहिला सोमवार - १४ जुलै २०२५
- श्रावणातील दुसरा सोमवार - २१ जुलै २०२५
- श्रावणातील तिसरा सोमवार - २८ जुलै २०२५
- श्रावणातील चौथा सोमवार - ४ ऑगस्ट २०२५
- श्रावणातील येणारी शिवरात्री - २३ जुलै २०२५
- नाग पंचमी - २९ जुलै २०२५
भगवान शिवाच्या आराधनेचा मार्ग म्हणजे रुद्राभिषेक
रुद्राभिषेक हा भगवान शिवाच्या पूजेचा सर्वात आवडता मार्ग मानला जातो, ज्यामध्ये शुद्ध पाणी, दूध, मध, दही, तूप, बेलपत्र, भस्म (राख), धतुर आणि आक फुले, चंदन, गंगाजल यासारख्या विविध पवित्र घटकांनी शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. ही पद्धत केवळ आध्यात्मिक प्रगतीच करत नाही तर जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता देखील देते असे मानले जाते.
रुद्राभिषेकाचे शुभ फळ (एक धारणा)
- रुद्राभिषेक केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात.
- व्यवसायात प्रगती होते. रोग आणि दुःखातून समाधान
- रुद्राभिषेक केल्याने मानसिक ताण कमी होतो.
- असाध्य रोग आणि जीवनातील इतर आरोग्यविषयक समस्यांपासून मानसिक समाधान.
Disclaimer : या लेखात नमूद गोष्टींचे फायदे पारंपारिक श्रद्धा आणि ज्योतिषीय अनुभवांवर आधारित आहेत. त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा असू शकतो. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, पात्र ज्योतिषी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय मानू नये.












Click it and Unblock the Notifications