अदानींना धक्क्यामागून धक्के; आता केनिया सरकारनेही दिला 'हा' मोठा झटका
Gautam Adani shocked again- भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना एकाच दिवसांत झटक्यांमागून झटके बसत आहेत. कथित यूएस लाचखोरी प्रकरणानंतर, आता कोनिया सरकारने अदानी समूहासोबतचा प्रस्तावित वीज करार रद्द केला आहे. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी गुरुवारी ही घोषणा करत, अदानींना अजून एक धक्का दिला.

केनियाने विमानतळ विस्तार केला रद्द
केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी घोषणा करताना सांगितले की, देशातील मुख्य विमानतळांचा विस्तार करण्याची योजना आता रद्द केली आहे. याबाबतचे आदेश दिले आहेत. भारतातील अदानी समूहाने या प्रकल्पासाठी बोली लावली होती. तसेच ऊर्जा मंत्रालयाने अदानी समूहाच्या एका युनिटसोबत पाँवर ट्रान्समिशन लाईन्स उभारण्यासाठी करार केला होता. तो ७०० दशलक्ष डाँलरपेक्षा जास्त होता. मात्र हा प्रस्तावही आता पुनर्विचारावर आहे.
अदानींवर अमेरिकेने केले आरोप
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर अमेरिकन वकिलांनी फसवणुकीचा आरोप केला होता. अमेरिकेत त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळण्यासाठी सुमारे दोन हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपानंतर दुपारपर्यंत अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले. न्यूयाँर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आला. सौरउर्जा कंत्राट मिळविण्यासाठी अदानी समुहाने लाच दिल्याच्या आरोपानंतर भारतात एकच खळबळ उडाली. गौतम अदानी यांच्या पुतण्याला अटक वाँरंटही जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications