शिवसेना आ. भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी, लिहिली भावनिक पोस्ट
Raksha Bandhan 2024 : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातही अनेक बहिण-भाऊ आहेत. हे बहिण-भाऊ रक्षाबंधनाला एकत्र येतात. आमदार भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राखी बांधली.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी यांनी तिकीट मिळाले नव्हते, त्यांना विधापरिषदेवर उमेवादवारी दिली आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या. भावना गवळी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होत्या.यावर्षीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून हा पवित्र सण साजरा केला.

भावना गवळी यांनी फेसबुक वर पंतप्रधानांना राखी बांधतानाचा फोटो शेअर केला असून पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बहिण-भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा याकरिता देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. यावेळी भाऊ म्हणून आपली समर्थ साथ मला समाजकार्यासाठी निरंतर ऊर्जा आणि उत्साह प्रदान करते. त्यामुळे यापुढे देखील आपण नेहमीप्रमाणे बहिणीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारच असा विश्वासासह अपेक्षा व्यक्त केली."
बहिण - भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा याकरिता देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. यावेळी भाऊ म्हणून आपली समर्थ साथ मला समाजकार्यासाठी निरंतर ऊर्जा आणि उत्साह प्रदान करते. त्यामुळे यापुढे देखील… pic.twitter.com/EynUU8zxmK
— Bhavana Gawali Patil (@mpbhavanagawali) August 19, 2024
सुप्रिया सुळे-अजित पवारांच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचे लक्ष
राज्यात राजकारणात नेहमी चर्चेत राहणारी सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही बहिण भावाची जोडी यावर्षी एकत्र रक्षाबंधन साजरे करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे सन्मान यात्रेच्या निमित्ताने आज मुंबईत असणार आहेत तर सुप्रिया सुळे नाशिक दौ-यावर आहेत. अजित पवार यांनी काल, "सुप्रिया जर मुंबईत असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधून घेणार आहे," असे म्हटले होते.
अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे हे दोन्ही बहिण भाऊ रक्षाबंधनाला एकत्र येणार का हे पाहणे महत्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications