Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi निमित्त राजांना मानाचा मुजरा, हे खास संदेश पाठवून करा अभिवादन
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 3 एप्रिल रोजी पुण्यतिथी. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 साली किल्ले रायगडावर झाला. यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे.
प्रजेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा राजा म्हणून शिवरायांची ओळख आहे. त्यांच्या धाडसाच्या, शौर्याच्या कथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत आपल्या राजाचा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आणि शिवरायांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी WhatsApp Messages, Facebook Messages, Status, Quotes शेअर करत करा अन् आपल्या राजाला मानाची मानवंदना द्या.

शिवरायांचा जन्म व बालपण कुठे गेले?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराज आई जिजाबाई यांच्या देखरेखीखाली वाढले. विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवाजी महाराजांनी लढाया लढून त्या जिंकल्या.
गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवरायांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. मग अशा रयतेच्या राजाला आज नक्कीच अभिवादन करा.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती!
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा..
छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस..
सिहांसनाधीश्वर.. योगीराज..
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

जगणारे ते मावळे होते..
जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा
'आपला शिवबा' होता.. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन...!
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता..
जय भवानी.. जय शिवाजी..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!
भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
अशा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!












Click it and Unblock the Notifications