सुवर्ण मंदिरात हल्ला झालेल्या सुखबीर सिंग बादल कोटवधी संपत्तीचे आहेत मालक, घ्या जाणून
Sukhbir Singh Badal Net Worth: शिरोमणी अकाली दल प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज सकाळी एका व्यक्तीने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षेचा एक भाग म्हणून अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सेवा करत होते.
त्यावेळी एका हल्लाखोरांने अचानक त्यांच्या दिशेने फायरिंग केली. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले आहेत. त्यावेळी उपस्थितीत पोलिसांनी हल्लेखोरावर झडप घालत वेळीच रोखले. आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केली असून पुढील पोलिस करत आहेत.

फोटो सौजन्य- पीटीआय
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री 62 वर्षीय सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तने त्यांना "चुकांसाठी" 'टंखा' (धार्मिक शिक्षा) सुनावल्यानंतर ते 'सेवादार' कर्तव्ये बजावत आहेत. 2007 ते 2017 या सत्ता काळात पंजाबमध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना ईशनिंदा प्रकरणात त्यांनी माफ केल्यामुळे त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. त्यांना सुवर्ण मंदिर आणि इतर अनेक गुरुद्वारांमध्ये 'सेवादार' म्हणून भांडी धुणे आणि बूट साफ करण्यास सांगितले आहे.
सुखबीर सिंग बादल यांच्याकडे किती संपत्ती ?
myneta वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची एकूण संपत्ती 2,02,64,27,815 रुपये म्हणजेच 202 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासोबतच त्यांच्यावर 66,95,01,768 रुपये म्हणजेच 66 कोटी रुपयांहून अधिकचे दायित्व आहे. 2022 च्या निवडणुकीदरम्यान देण्यात आलेल्या माहीतीनुसार आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख बादल यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. या काळात तिने दिलेल्या मालमत्तेच्या तपशिलात त्यांचे पती सुखबीर सिंग बादल यांच्या मालमत्तेचाही समावेश होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची आणि त्यांच्या पतीची एकूण संपत्ती 135.79 कोटी रुपये आहे.
कौर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची आणि त्यांचे पती बादल यांची चल आणि स्थावर मालमत्ता अनुक्रमे 54.86 कोटी रुपये आणि 80.93 कोटी रुपये असल्याचे घोषित करण्यात आले. त्यांनी सुखबीर बादल यांच्याकडे 62.70 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.












Click it and Unblock the Notifications