Independence day : स्वातंत्र्यदिनी 1037 जणांना मिळणार शौर्य अन् सेवा पदकं, गृहमंत्रालयाची यादी जाहीर
नवी दिल्ली - यंदा देश गुरुवारी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी बुधवारी सरकारने राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 1037 जवानांना यावर्षी शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात येणार आहेत.
सरकार दर वर्षी परागकोटीचे शौर्य आणि जीव, राष्ट्रीय मालमत्ता वाचवण्यासाठी आणि दहशतवादी, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी केलेल्या अतुलनीय शौर्यासाठी राष्ट्रपती पदक आणि शौर्य पदक प्रदान करते.

महाराष्ट्रातील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) प्राप्त अधिकारी
- चिरंजीव रामछबिला प्रसाद, अतिरिक्त महासंचालक (महाराष्ट्र)
- राजेंद्र बाळाजीराव डहाळे, संचालक, (महाराष्ट्र)
- सतीश रघुवीर गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (महाराष्ट्र)
- द्वारकादास महादेवराव भांगे (छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र)

राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याबद्दल द्वारकादास भांगे(पांढरा शर्ट)यांचा सत्कार करताना वरिष्ठ पोलिस अधिकारी
गृह मंत्रालयाने नावे जाहीर केली
राष्ट्रपती शौर्यपदक तेलंगना पोलिस दलातील हेडकाॅन्स्टेबल चडुवु यदया यांना जाहीर झाला तर 213 जणांना शौर्यपदक, 94 जणांना विशिष्ट राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील चिरंजीव प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश ओवेकर यांना पदकं तर 729 जणांना गुणवत्तापुूर्ण पदक जाहीर झालं आहे.
शौर्यगाथा घडवणाऱ्या विरांचा सन्मान
गृह मंत्रालयाने पदक मिळविणाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. एडीजी सुवेंद्र कुमार भागल, डीआयजी कल्पना सक्सेना, इन्स्पेक्टर सुगंधा उपाध्याय आणि उत्तर प्रदेशचे एसआय रामवीर सिंग यांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातून एडीजी सुवेंद्र कुमार भागल, डीआयजी कल्पना सक्सेना, इन्स्पेक्टर सुगंधा उपाध्याय आणि एसआय रामवीर सिंग यांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार आहेत. केंद्र सरकार दर वर्षी राष्ट्रपतींचे शौर्य पदक आणि शौर्य पदक देऊन शौर्यगाथा घडवणाऱ्या विरांना सन्मानित करते.












Click it and Unblock the Notifications