Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन; दिवगंत सुषमा स्वराज यांचे होते पती!, वाचा त्यांच्याविषयी!

Former Governor Swaraj Kaushal Passes Away : माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील, ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांचे आज, ४ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिल्ली भाजपने त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. देशाच्या कायदेशीर आणि प्रशासकीय क्षेत्रात एक आदराचे स्थान असलेले स्वराज कौशल यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्वराज कौशल: एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

स्वराज कौशल हे भारतीय सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत प्रामाणिक आणि कुशाग्र वृत्तीचे प्रशासक म्हणून ओळखले जात होते.

Former Governor Swaraj Kaushal Passes Away

सर्वात तरुण राज्यपाल होण्याचा विक्रम

स्वराज कौशल यांनी आपल्या कार्यकाळात एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला. ते केवळ ३७ वर्षांचे असताना मिझोरामचे राज्यपाल बनले आणि त्यांनी १९९० ते १९९३ या काळात हे पद भूषवले. इतक्या कमी वयात राज्यपालपद भूषवणारे ते देशातील सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक होते.

स्वराज्य कौशल यांचे जन्म १२ जुलै १९५२ रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठातून शिक्षण झाले. सर्वोच्च न्यायालयात वकीलाचा व्यवसाय केला. मिझोरामचे माजी राज्यपाल, राज्यसभेचे माजी खासदार (सहा वर्षे) असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वयाच्या ३७ व्या वर्षी राज्यपाल बनणारे सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक अशी त्यांची ओळख होती.

सुषमा स्वराज यांच्याशी विवाह

स्वराज कौशल यांनी १९७५ मध्ये भाजपच्या प्रमुख नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्याशी विवाह केला. सुषमा स्वराज यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्री आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यांचे २०१९ मध्ये आजारपणामुळे निधन झाले.

बांसुरी स्वराज हे एकमेव अपत्य!

स्वराज कौशल आणि सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज आहेत. त्या आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात सक्रिय आहेत. बांसुरी स्वराज या सध्या भाजपच्या दिल्ली युनिटमधील एक प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील खासदार म्हणून कार्यरत आहेत.

दिल्लीत झाले अंत्यसंस्कार!

राजकारण आणि कायदेशीर क्षेत्रात खोलवर छाप सोडणारे स्वराज कौशल यांचे निधन देशासाठी एक मोठे नुकसान मानले जात आहे. अंतिम संस्काराची आज, ४ डिसेंबर २०२५, दुपारी ४:३० वाजता, लोधी रोड स्मशानभूमी, नवी दिल्ली येथे झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+