Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सीमा हैदरने स्वतःला कोंडून घेतले, पती सचिन मीणाही अस्वस्थ; मुलांसह पाकिस्तानात जाणार का? काय घडतंय?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहिम सुरु करण्यात आली. त्यांना परत पाकिस्तानात पाठविण्याचे काम सुरु करण्यात आले. गृहमंत्रालयाकडून अधिकृत व अनधिकृत पाकिस्तानी नागरिकांना शोधले जाऊ लागले. या सगळ्या प्रकारानंतर आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून अनधिकृतपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरु झाली. सीमाला पाकिस्तानात पाठवणार का? हा प्रश्न पुढे आला.

Seema Haider

कोण आहे सीमा हैदर?

एका मोबाईल गेमद्वारे ओळख झाल्यानंतर पाकिस्तानची रहिवाशी व चार मुलांची आई असलेली सीमा हैदर भारतात आली. नोएडा येथील सचिन मीणासोबत तिने संसार थाटला. व्हिजा न घेता नेपाळमार्गे ती अनधिकृतपणे भारतात आली. सोबत तिने तिची चार मुलेही आणली. त्यावेळी चांगलाच गदारोळ झाला होता. अखेर काही अटी व शर्तीवर तिला भारतात ठेवण्यात आले.

सीमाने स्वतःला कोंडले

आता भारताकडून पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहिम सुरु आहे. अधिकृत व अनधिकृत पाकिस्तानी नागरिकांना भारतात पाठविण्यात येत आहे. त्यात सीमा हैरदलाही आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानमध्ये जावे लागणार, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता सीमा हैदरने स्वतःला तिच्या घरातील एका खोलीत कोंडून घेतले आहे. पत्रकारांच्या किंवा अन्य कुणाच्याही प्रश्नांना ती सध्या उत्तरे देत नाही.

सचिन मीणाही बोलेना

सीमा हैदरने पत्रकारांना टाळण्यासाठी स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर पती सचिन मीणानेही पत्रकारांशी बोलणे टाळले आहे. आपल्या पत्नीला पाकिस्तानात पाठवविणार का, याबाबत तो काहीच बोलत नाही. दरम्यान, सीमा हैदरने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना तिला पाकिस्तानात परत पाठवू नये, असे आवाहन केले आहे . अलिकडेच सीमाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आवाहन केले होते की ती पाकिस्तानची मुलगी असली तरी आता ती भारताची सून आहे. अशा परिस्थितीत त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली पाहिजे, असे तिचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी पतीचा संताप

सीमा हैदरच्या पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सीमा हैदरविरुद्ध संताप व्यक्त केला होता. गुलामने एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की जर सीमा हैदर पाकिस्तानात परत आली तर तो तिला खूप मारहाण करेल. व्हायरल व्हिडिओमध्ये गुलाम हैदर यांनी सीमा हैदर, वकील एपी सिंह आणि सचिन मीना यांना चप्पल दाखवताना अपशब्द वापरले होते. गुलाम हैदरचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+