स्वातंत्र्यदिनीच एसबीआयचा ग्राहकांना झटका! कर्जे महागली, नवीन दर आजपासून लागू
SBI Bank : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्वातंत्र्यदिनी मोठा धक्का दिला आहे. सरकारी बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. वास्तविक, बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एमसीआरएलच्या सीमांत खर्चात वाढ केली आहे. बँकेने कर्जाच्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. नवीन दर आज 15 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
कर्जे महागली
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ओव्हरनाईट कालावधीसाठी एमसीआरएल 8.20% पर्यंत वाढला आहे, जो पूर्वी 8.10% होता. एका महिन्याच्या कालावधीसाठीचे दर 8.35 टक्क्यांवरून 8.45 टक्के करण्यात आले आहेत. 3 महिन्यांसाठी एमसीआरएल 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के करण्यात आला आहे. 6 महिन्यांसाठी एमसीआरएल 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आला आहे.

1 वर्षाच्या कालावधीसाठी एमसीआरएल 8.85% वरून 8.95% करण्यात आला आहे. तर 2 वर्षांच्या कालावधीसाठी 8.95% वरून 9.05% पर्यंत वाढवण्यात आला आहे, तसेच 3 वर्षांच्या कालावधीसाठी एमसीआरएल 9.0% वरून 9.10% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ईएमआयवर होणार परिणाम ?
RBI ने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. असे असतानाही निवडक बँकांनी लेंडिंग रेट्स वाढवले आहेत. कारण सर्वसाधारणपणे बँकेचे अवलंबित्व एमसीआरएल वरुन लेंडिंग रेट्समध्ये बदलले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या ऑगस्टच्या धोरणात सलग 9व्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आले. या संदर्भात, सध्याचा रेपो रेट 6.5% वर कायम आहे.












Click it and Unblock the Notifications