Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! SBI बॅंकेत क्लर्कची मेगाभरती, कसा कराल अर्ज

SBI Clerk Notification 2024-25 : स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लर्कची भरती जाहीर केली आहे. या भरतीचे नोटिफिकेशन आले आहे. यामध्ये एकून 13 हजार 735 पदे भरली जाणार आहेत. तर महाराष्ट्रासाठी 1 हजार 163 पदे आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या भरतीसाठी 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 असणार आहे.

Know How to Apply SBI Bank Job

प्रवर्गानुसार असे आहे आरक्षण

या भरतीतील रिक्त पदांपैकी 5870 अनारक्षित जागा आहेत. तर अनुसुचित जातींसाठी 2 हजार 118, अनुसुचित जमातींसाठी 1385, इतर मागासवर्गीयसाठी 3001, आणि 1362 जागा EWS प्रवर्गासाठी राखीव आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.

कोणत्या राज्यासाठी किती जागा

उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) तुम्हाला चांगले ज्ञान असले पाहिजे.

मध्य प्रदेशसाठी 1317, छत्तीसगडसाठी 483, चंदीगडसाठी 32, दिल्लीसाठी 343, जम्मू आणि काश्मीरसाठी 141, हिमाचलसाठी 170, पंजाबसाठी 769, राजस्थानसाठी 445, उत्तर प्रदेशसाठी 1894, उत्तराखंडसाठी 316, बिहारसाठी 1119, गुजरातसाठी 1073, झारखंडसाठी 676 तसेच महाराष्ट्रासाठी 1163 जागा भरल्या जाणार आहेत.

शिक्षणाची पात्रता कशी

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. परंतु पदवी ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी प्राप्त झाली पाहिजे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार या पदासाठी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. SBI क्लर्क टियर-१ परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये आणि मुख्य परीक्षा मार्च-एप्रिल २०२५ मध्ये घेतली जाईल.

अर्ज शुल्क-
१. सामान्य प्रवर्ग, EWS, OBC - ७५०२.

SC, ST, अपंग प्रवर्ग - कोणतेही शुल्क नाही

भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा​

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात तारीख - १७ डिसेंबर २०२४
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०२५
  • पूर्व परीक्षेची तारीख - फेब्रुवारी २०२५
  • मुख्य परीक्षा - मार्च एप्रिल २०२५
  • परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी प्रिलिम्स प्रवेशपत्र जारी केले जातील.

वयोमर्यादेत यांना मिळाली सूट

१. अनुसुचित जाती/ जमाती (SC/ST) - पाच वर्षे
२. इतर मागासवर्गीय (OBC) - तीन वर्षे
३. PwBD (Gen/EWS) - १० वर्षे
४. PwBD (SC/ST) - १५ वर्षे
५. PwBD (OBC) - १३ वर्षे
६. माजी सैनिक - संरक्षण सेवांमध्ये सादर केलेल्या सेवेचा वास्तविक कालावधी + 3 वर्षे, (अनुसूचित जाती/जमातीतील अपंग माजी सैनिकांसाठी 8 वर्षे) कमाल. वय 50 वर्षे.
७. विधवा, घटस्फोटित महिला आणि न्यायिकरित्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या आणि पुनर्विवाह न केलेल्या महिला- ७ वर्षे (सामान्य/ईडब्ल्यूएससाठी कमाल ३५ वर्षे, ओबीसीसाठी ३८ वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादेच्या अधीन)
८. SBI चे प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी - SC/ST- ६ वर्षे, OBC- ४ वर्षे, GEN/EWS १ वर्ष, PwBD (SC/ST) - १६ वर्षे, PwBD (OBC) - १४ वर्षे, PwBD (जनरल/EWS) - ११ वर्षे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+