'सेंगोल' वरून संसदेत धुमश्चक्री;समाजवादी पक्षाचे खासदार आक्रमक
नवी दिल्ली : 2023 मध्ये भारताच्या नव्या संसद भवनाचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले. यावेळी त्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाणार ' सेंगोल ' संसदेत स्थापित करण्यात आला होता. पण, आता या सेंगोलवरून संसद भवनात चांगलंच राजकारण रंगल्याच पाहायला मिळालं.

समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. तर बदल्यात संसदेत संविधान ठेवण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण काय?
संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचं संविधानाची प्रत ठेवा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. ज्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत.
समाजवादी पक्षाने तामिळ संस्कृतीचा अपमान केला - योगी आदित्यनाथ
आर. के. चौधरी यांनी जे पत्र लिहिलं आणि सेंगोल हटवण्याची मागणी केली त्यानंतर योगी आदित्यनाथ आक्रमक झाले. अशी मागणी करून "समाजवादी पक्षाने तामिळ संस्कृतीचा अपमान केला आहे. अस त्यांनी म्हटलं. इंडिया आघाडीलाही हा अपमान सहन होतो आहे. कारण संस्कृतीचा अपमान करणं हेच काँग्रेसही करत आला आहे." या आशयाची पोस्ट योगी आदित्यनाथ यांनी लिहिली आहे.
सेंगोलचा इतिहास थोडक्यात:
चोल साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सोपावताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोल'चा वापर केला जात असे. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई.
पंडित नेहरू आणि सेंगोलचा संबंध:
हा धागा पकडत योगी आदित्यनाथ यांनी पंडित नेहरूंनी सेंगोल कसा स्वीकारला असा सवाल उपस्थित केला आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये पुजाऱ्यांनी हा राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांना दिला. त्यानंतर तो त्यांच्याकडून परत घेतला. पुढे मोठी मिरवणूक काढून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. त्यानंतर हा राजदंड नेहरूंकडे सुपूर्द करण्यात आला. अशी नोंद कागदपत्रं आहे.
आता पुढे काय?
भाजप खासदार आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मुद्द्यावर सपाचे खासदार आणि अखिलेश यादव यांचा पुरता समाचार घेतला आहे. असं असेल तरी संविधानाची प्रत संसदेत ठेवण्याची मागणी भाजप पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Click it and Unblock the Notifications