अंबानी-अदानीची पत्नी नाही, रोशनी नादर जगातील 5 व्या क्रमांकाची श्रीमंत महिला,जाणून घ्या एकूण संपत्ती
Hurun Global Rich List 2025: जेव्हा भारतातील श्रीमंत कुटुंब आणि महिलांचा विचार केला जातो तेव्हा सामान्य लोकांच्या मनात अंबानी आणि अदानी कुटुंबातील महिलांची नावे समोर येतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील सर्वात श्रीमंत महिला या दोन्ही कुटुंबातील नाहीत. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार, भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नादर मल्होत्रा आहेत, त्या एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा या भारतातीलच नाही तर जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. रोशनी नादर मल्होत्रा या वर्षी जागतिक टॉप 10 महिला रँकिंगमध्ये स्थान मिळवणा-या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. रोशनी नादर मल्होत्रा सध्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहे. एवढेच नाही तर रोशनी सध्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला 6 मार्च 2025 रोजी एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर यांनी एचसीएल कॉर्पोरेशन आणि वामा दिल्लीमधील त्यांचे 47 टक्के हिस्सेदारी त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्राला सुपूर्द केले आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा कोण आहे?
रोशनी नादर मल्होत्राचा यांचा जन्म 1982 मध्ये दिल्ली येथे झाला आहे. रोशनी नादर मल्होत्रा 2020 पासून एचसीएल टेक्नॉलॉजीजचे नेतृत्व करत आहेत. रोशनी नादर मल्होत्रा यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर रोशनी यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली आहे.
रोशनी नादर मल्होत्रा एचसीएल टेकच्या अध्यक्षा आहेत. जुलै 2020 पासून त्या हे पद भूषवत आहेत. रोशनी नाडर यांचे लग्न एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष शिखर मल्होत्रा यांच्याशी झाले आहे. रोशनी अनेक जागतिक सल्लागार मंडळांवर काम करतात, ज्यात एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील डीन सल्लागार परिषद आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) यांचा समावेश आहे.
रोशनी नादर मल्होत्रा ही द नेचर कंझर्व्हन्सी (TNC) च्या बोर्ड सदस्या देखील आहेत. यावरून रोशनी या पर्यावरणीय शाश्वततेसाठी किती वचनबद्ध आहे हे दिसून येते. कॉर्पोरेट क्षेत्राव्यतिरिक्त रोशनी नादर मल्होत्रा या शिव नादर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक परोपकारी कामांमध्ये सहभागी आहेत. हे फाउंडेशन शिक्षण आणि सामाजिक बदलावर काम करते. रोशनी द हॅबिटॅट्स ट्रस्टशी देखील त्या संबंधित आहेत.
रोशनी नादर यांची एकूण संपत्ती?
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार रोशनी नाडर यांची एकूण संपत्ती $30.1 अब्ज म्हणजेच 3.5 लाख कोटी रुपये आहे. रोशनी नाडर यांना आपली संपत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांचे वडील शिव नाडर हे $35.9 अब्ज संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. परंतु मुलगी रोशनीला मालमत्ता हस्तांतरित केल्यामुळे त्यांचे स्थान घसरलं आहे.












Click it and Unblock the Notifications