RBI Threat: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बची धमकी, मुंबई पोलीस हाय अलर्टवर
RBI Bomb Threat: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) बॉम्बची धमकी मिळाली आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी दुपारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर रशियन भाषेतील धमकीचा ई-मेल आला आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
याप्रकरणी मुंबईतील माता रमाबाई मार्गावरील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआय अधिकृत वेबसाइटच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल धमकीचा ई मेल पाठवण्यात आला आहे. एक महिन्यात दुस-यांदा आरबीआयला धमकी मिळाली आहे.

या घटनेनंतर माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. हा ईमेल कोठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांचे झोन 1 डीसीपी म्हणाले, "भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला आहे. हा ईमेल रशियन भाषेत होता, ज्यामध्ये बँक उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. माता रमाबाई मार्गावर ( एमआरए मार्ग) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications