गुजरातच्या समुद्रात रंगला थरार, पाकिस्तानच्या ताब्यातून सात भारतीय मच्छिमारांची सुटका
Gallantry of the Indian Coast Guard- भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. रविवारी दुपारी गुजरातच्या किनारपट्टीपासून खोल समुद्रात थरार रंगला. भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तान मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या ताब्यातून सात भारतीय मच्छिमारांची सुटका केली. भारत- पाकिस्तानच्या सीमेजवळ प्रतिबंधक क्षेत्राच्या आसपास मासेमारी करणाऱ्या भारतीयांची बोट गेली होती. त्यानंतर हा थरार रंगला.

नेमकं काय झालं होतं?
भारतीय मच्छिमार नौकेने रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास भारतीय तटरक्षक दलाला ते अडचणीत असल्याचा सिग्नल पाठवला. हा सिग्नल भारत-पाकिस्तान सिमेजवळील प्रतिबंधक क्षेत्राजवळून आला होता. भारतीय मच्छिमारांची कालभैरव नावाची नौका पाकिस्तानच्या पीएमएसए जहाने रोखली होती. कालभैरव नौकेत असणाऱ्या सात भारतीय मच्छिमारांना पाकिस्तान तटरक्षक दलानं अटक केली होती. त्यानंतर भारतीय तटरक्षक दल तातडीने प्रतिबंधीत क्षेत्राकडे पोहोचलं.
सिग्नल मिळताच लगेच कारवाई
तटरक्षक दलाला भारतीय बोटीकडून धोक्याचा सिग्नल मिळताच त्यांनी लगेच कारवाई सुरु केली. तटरक्षक दलाने आपली नौका भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाठवली. तटरक्षक दलाने मागे हटावे यासाठी पाकिस्तानी नौकेनेही प्रयत्न केले. पण भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी बोटीला सागरी सीमेजवळ रोखून धरलं. त्यांना भारतीय मच्छीमारांना सोडण्यासाठी भाग पाडलं. भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छीमारांची सुखरुप सुटका करण्यासाठी भाग पाडलं. या सर्व सात मच्छिमारांची प्रकृती स्थिर आहे. या सगळ्या कारवाई दरम्यान कालभैरव बोटीच मात्र नुकसान झाल्याचे समजते.
@IndiaCoastGuard rescued 07 fishermen apprehended by Pakistan Maritime Security Agency (PMSA) near the #India #Pakistan maritime boundary on 17 Nov 24. #ICG swiftly responded to a distress call, intercepted PMSA, and ensured the safe return of the crew. #ICG remains committed to… pic.twitter.com/pP1GiTS8SC
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) November 18, 2024
मच्छिमारांच्या बोटीची चौकशी होणार
भारतीय मच्छीमारांना घेऊन तटरक्षक दलाचे जहाज सोमवारी ओखा बंदरात पोहोचलं. आता भारतीय तटरक्षक दल, गुजरात पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि मच्छीमार खात्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सी आणि कालभैरव नौका आमने-सामने कशी आली? त्याचा तपास केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications