लाडक्या बहिणींसारखेच दिल्लीच्या महिलांना मिळणार महिन्याला अडीच हजार! CM होताच रेखा गुप्तांची घोषणा
Rekha gupta oath ceremony : दिल्लीत भाजपने निर्भेळ यश मिळवत 27 वर्षानंतर सत्ता मिळवली आहे. दिल्लीतील मतदारांना दिलेली आश्वासने पाळण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या शपथ घेत आहेत, या शपथ समारंभापुर्वी त्यांनी एक मोठी घोषणा दिल्लीच्या महिलांसाठी केली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी 19 फेब्रुवारी रोजा बुधवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत प्रथमच आमदार रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच भावी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भाजपच्या निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे, या मालिकेत गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी त्यांनी महिलांना भाजप सरकार दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

कोणत्या दिवसापासून महिलांना पैसे मिळतील?
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनताच रेखा गुप्ता म्हणाल्या की, भाजपच्या निवडणूक आश्वासनानुसार मासिक मदतीचा पहिला हप्ता 8 मार्चपर्यंत दिल्लीतील महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्तेत आल्यास महिलांना अडीच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप आता जिंकला असल्याने आणि सरकार स्थापनेपूर्वीच महिलांना पैसे कधी देणार, असा प्रश्न विचारला जात होता, त्यामुळे आता पैसे देणार हे स्पष्ट केले आहे.
आता शपथ घेण्यापूर्वी नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी उत्तर दिले आहे. गुप्ता यांनी भाजपने दिलेली आश्वासने प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत बोलले आहे. त्या म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी भाजपच्या सर्व 48 आमदारांची आहे.
मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया आली, त्यात त्यांनी आम्ही महिलांना आर्थिक मदतीसह सर्व आश्वासने नक्कीच पूर्ण करू असे म्हटले आहे. 8 मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात रक्कम निश्चितपणे हस्तांतरित केली जाईल हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भव्य शपथविधीची तयारी
भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत आली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या माजी अध्यक्षा आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या वतीने हा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात येत असून यामध्ये चित्रपट जगतातील आणि राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.












Click it and Unblock the Notifications