इंजिन बिघडलं की आणखी काही? अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कसं क्रॅश झालं?
गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज सकाळी भीषण विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचं बी787 ड्रीमलायनर प्रकारचं प्रवासी विमान (VT-ANB), जे अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालं होतं, ते उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळलं.

या विमानात एकूण 242 प्रवासी होते - ज्यामध्ये 2 वैमानिक, 10 केबिन क्रू आणि 230 प्रवासी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सर्वजण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इंजिन बिघाड की इमारतीला धडक? संभाव्य कारणांचा शोध
विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून दोन प्रमुख शक्यता चर्चेत आहेत. काही प्राथमिक अहवालांनुसार, टेकऑफनंतर पाचव्या मिनिटाला इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, विमानाने शहरातील एका रहिवासी इमारतीला धडक दिली, ज्यामुळे प्रचंड स्फोट झाला आणि संपूर्ण विमान जळून खाक झालं.
काळ्या धुराचे लोट आणि आगीचा तांडव
अपघाताच्या ठिकाणी आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर आकाशात उठताना दिसले. धारपूर परिसरातूनही ही दृश्यं स्पष्टपणे पाहता आली. विमान ज्या इमारतीवर कोसळलं, ती इमारतही मोठ्या प्रमाणात ध्वस्त झाली आहे. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या 7 गाड्या, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पायलट आणि तांत्रिक माहिती
हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण करत होतं, ज्यांना 8200 तासांचा अनुभव आहे. त्यांच्या सहकारी फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे 1100 तासांचा अनुभव होता.
दोघेही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. एटीसीच्या माहितीनुसार, विमान धावपट्टी क्रमांक 23 वरून 1.39 वाजता (IST) टेकऑफ झालं. काही वेळाने मेडे कॉल दिला गेला, मात्र त्यानंतर कोणताही संवाद झाला नाही. विमान थेट मेघानीनगरच्या सीमेजवळ जमिनीवर आदळलं.
रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था, शहरात भीतीचं वातावरण
विमानतळाजवळील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. जखमी आणि मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय व पोलिस प्रशासन सज्ज आहे. अपघातामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना आहे.
सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल
या अपघातानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये विमानाच्या अपघातानंतर उठणारा काळा धूर, जळालेली इमारत आणि आगीचे भयावह दृश्य स्पष्ट दिसत आहेत.
सरकारी तपास आणि एअर इंडियाचा निवेदन अपेक्षित
सध्या एअर इंडिया आणि नागरी विमान मंत्रालयाने घटनास्थळावर तपासणी सुरू केली आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असून, ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियाकडून लवकरच अधिकृत निवेदन जाहीर होणार आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications