पुन्हा भीषण विमान अपघात! रांची-दिल्ली 'एअर ॲम्ब्युलन्स' कोसळली; रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू

Ranchi delhi air ambulance crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात झाल्यानंतर पुन्हा जवळपास एक महिन्याच्या आतच झारखंडच्या चतरा जिल्ह्यात सोमवारी रात्री विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रांचीहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेली 'रेडबर्ड एअरवेज'ची एअर ॲम्ब्युलन्स तांत्रिक बिघाडामुळे कोसळली. या भीषण अपघातात विमानातील रुग्ण, दोन पायलट, डॉक्टर आणि निमलष्करी कर्मचाऱ्यांसह सातही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Ranchi delhi air ambulance crash

कुठे कधी घडली घटना?

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसारी पंचायत क्षेत्रात सोमवारी रात्री ७:३० च्या सुमारास एक एअर ॲम्ब्युलन्स कोसळून मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 'रेडबर्ड एअरवेज'चे Beechcraft C90 (VT-AJV) हे विमान रांची विमानतळावरून रात्री ७:११ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या २३ मिनिटांतच या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि ते चतराच्या जंगलात कोसळले.

संपर्क तुटला अन् घात झाला!

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान हवेत असताना पुढच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) स्टेशनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, रडारवरून गायब होण्यापूर्वी विमानाचा कोलकाता एटीसीशी असलेला संपर्क तुटला. चतरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा ढिगारा आणि मृतांचे अवशेष शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे.

'या' मृतांची झाली ओळख

या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या सात जणांमध्ये संजय कुमार (४१) या रुग्णाचा समावेश आहे, त्यांना उपचारासाठी दिल्लीला नेले जात होते. विवेक विकास भगत आणि सवराजदीप सिंह हे विमानाचे पायलट असून डॉ. विकास कुमार गुप्ता या वैद्यकीय अधिकाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला. पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, अर्चना देवी आणि धुरु कुमार या रुग्णाचे नातेवाईक,अटेंडंटचाही विमान अपघातात मृत्यू झाला. या सर्वांची ओळख पटली आहे.

विमान अपघाताच्या तपासाचे आदेश

अपघाताची माहिती मिळताच 'एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'ची (AAIB) टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. विमान कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड होता की खराब हवामान, याचा तपास आता केला जात आहे. चतराचे पोलीस अधीक्षक स्वतः या शोधमोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+