'जहन्नूमच्या आगी'पासून कोणता अशरा वाचवतो? किती व कसे असतात अशरा? वाचा संपूर्ण माहिती
इस्लामिक कॅलेंडरच्या ९ व्या महिन्यात मुस्लिम लोक महिनाभर उपवास ठेवतात. या महिन्यात उपवास करणे हे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानले जाते. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेलेल मुस्लिम बांधव या संपूर्ण महिनाभर रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काहीही न खाता किंवा पिता राहतात. रमजानचा महिना चंद्रदर्शनानुसार २९ ते ३० दिवसांचा असतो. हा पवित्र महिना तीन टप्प्यात विभागला जातो, ज्याला रमजानचा 'अशरा' म्हणतात. आज आपण रमजानच्या याच आशराबाबत जाणून घेणार आहोत.

कसे विभागले गेले आशरा
१. पहिला अशरा अल्लाह (रहम) ची दया दर्शवितो.
२. दुसरा अशरा अल्लाहची क्षमा (मगफिरत) दर्शवितो.
३. तिसरा अशरा हा नरकापासून संरक्षण (मोक्ष) प्रदान करण्यासाठी असतो.
कसे आहेत आशराचे टप्पे
अशराचे तिन टप्पे हे प्रत्येक साधारणः १० दिवसांचे आहेत. आता पहिला अशरा सुरु आहे. लवकरच तिसरा अशरा येणार आहे. रमजान महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि नरकाचे दरवाजे बंद केले जातात असे म्हटले जाते. या काळात राक्षसांना साखळ्यांनी बांधले जाते. रमजानचा तिसरा अशरा हा रमजानच्या शेवटच्या १० दिवसांचा असतो. हे दिवस नरकाच्या आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आहेत. या वेळी 'अल्लाहुमा अजिरनी मिनान नार' असे पठण करावे, ज्याचा अर्थ आहे, 'हे अल्लाह! मला नरकाच्या आगीपासून वाचवा.
काय केले पाहिजे?
नरकाच्या आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण या १० दिवसांत अल्लाहची पूजा केली पाहिजे. अल्लाहला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. याशिवाय, इतिकाफमध्ये बसले पाहिजे, जेणेकरून तुमचा बहुतेक वेळ इबादतमध्ये जाईल. बरेच लोक १० दिवस इतिकाफमध्ये बसतात (प्रार्थनेसाठी शांत ठिकाणी बसतात, या काळात व्यक्ती सांसारिक गोष्टींपासून दूर राहते आणि फक्त प्रार्थना करते), तर बरेच लोक ३ दिवस बसतात. नरकाच्या आगीपासून बचावासाठी शक्य तितकी प्रार्थना करावी. रमजानचा महिना आशीर्वाद, दया आणि क्षमा यांनी भरलेला आहे यात शंका नाही. सर्व मुस्लिमांसाठी अल्लाहकडून अधिक आशीर्वाद मिळविण्याचा आणि त्यांच्या क्षमेसाठी प्रार्थना करण्याचा हा एक विशेष प्रसंग आहे.












Click it and Unblock the Notifications