Ramadan 2025: अशरा म्हणजे काय? तो किती दिवस चालतो? दुसरा अशरा कधीपासून आहे? वाचा संपूर्ण माहिती
देशभरात 2 मार्चपासून रमजान 2025 चा पहिला उपवास पाळण्यात आला. या संपूर्ण महिन्यात मुस्लिमांना उपवासासह चांगली कामे करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शांत राहण्याचा, भरपूर प्रार्थना करण्याचा हा महिना समजला जातो. संपूर्ण रमजान महिन्याचे तीन भाग केले जातात. त्याला 'अशरा' असे म्हणतात. रमजानच्या महिनाभरात या तिन्ही 'अशरा'चे वेगवेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. काय आहे 'अशरा'? काय असतात त्याचे नियम? तो किती काळ चालेल? हेच आपण पाहूयात...

रमजानचा महिना किती काळ चालेल?
रमजानचा महिना मार्च अखेरपर्यंत चालणार आहे. जोपर्यंत ईदचा चंद्र दिसत नाही, तोपर्यंत उपवास पाळला जातो. तो किती दिवस पाळला जाईल, हे निश्चित करता येत नाही. मात्र सध्या ईदच्या दोन तारखा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये पहिली तारीख 1 एप्रिल आणि दुसरी तारीख 2 एप्रिल असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यावेळी 30 उपवास होणार की 29 उपवास होणार हे ईदचा चंद्र आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
पहिला 'अशरा' कधी सुरु झाला
दोन मार्चपासून रमजानचे उपवास सुरु झाले. पहिल्या दहा दिवसाचा काळ म्हणजे पहिला 'अशरा'. हा दोन मार्चपासून सुरु झाला. तो पुढचे दहा दिवस चालणार आहे. म्हणजेच सध्या पहिला 'अशरा' सुरु आहे. तो १२ मार्चपर्यंत चालणार आहे.
दुसरा 'अशरा' कधी सुरू होतो?
आता पहिला 'अशरा' दहाव्या उपवासापर्यंत सुरू राहणार आहे. दुसरा आश्ररा 11 व्या उपवासापासून सुरू होईल. तो 20 व्या उपवासापर्यंत सुरू राहणार आहे. या काळात उपवास करणारे लोक त्यांच्या पापांची क्षमा मागतात. ज्यासाठी 'अस्तगफिरुल्लाह' (मी अल्लाहकडून क्षमा मागतो) अल्लाहकडून क्षमा मागितली जाते. याशिवाय या 10 दिवसांत गरीब लोकांना शक्य तितकी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, रमजानच्या संपूर्ण महिन्यात गरिबांना मदत केली जाऊ शकते.
गरीबांना केली जाते मदत
गरजू व्यक्तीला मदत करण्याचा योग्य मार्गही सांगितला आहे. इस्लाममध्ये असे म्हटले आहे की एखाद्याला अशा प्रकारे मदत करा की आपल्या दुसऱ्या हाताला देखील त्याची माहिती नाही. याचा अर्थ मदत केलेल्या व्यक्तीबद्दल कोणालाही सांगू नये. या मदतीचे मोठे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यामुळे या काळात मुस्लिम समाज दुसऱ्याला खूप मदत करतो.












Click it and Unblock the Notifications