Ramadan 2025: 9 मार्चला आठवा उपवास; मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक सेहरी व इफ्तारची वेळ काय?
देशभरात 2 मार्चपासून रमजान 2025 चा पहिला उपवास पाळण्यात आला. या संपूर्ण महिन्यात मुस्लिमांना उपवासासह चांगली कामे करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शांत राहण्याचा, भरपूर प्रार्थना करण्याचा हा महिना समजला जातो. रमजाननंतर ईद साजरी केली जाणार आहे. आठवा उपवास उद्या रविवारी म्हणजेच ९ मार्चला आहे. या दिवशी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ काय असेल, हे सांगणार आहोत.

देशातील वेगवेगळ्या शहरांत सेहरी व इफ्तारची वेळ ही वेगवेगळी असते. अशा स्थितीत तुम्ही ज्या शहरात राहता, त्या शहरातील सेहरी व इफ्तारची वेळ तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. रविवारी आठवा उपवास असणार आहे. रमजान पूर्ण झाल्यानंतर देशभर ईदचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्याला देवाच्या उपवासाचा महिना संबोधले जाते. या महिन्यात सर्व मुस्लिम धर्मीय उपवास धरतात. नमाज पढतात. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम सकाळी सेहरी खाऊन उपवास सुरु करतात व संध्याकाळी इफ्तारने उपवास सोडतात.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील वेळ
मुंबई
सेहरीची वेळ ५.३७ एएम
इफ्तारची वेळ ६.४७ पीएम
पुणे
सेहरीची वेळ ५.३५ एएम
इफ्तारची वेळ ६.४३ पीएम
नाशिक
सेहरीची वेळ ५.३५ एएम
इफ्तारची वेळ ६.४३ पीएम
संभाजीनगर
सेहरीची वेळ ५.२९ एएम
इफ्तारची वेळ ६.३६ पीएम
सोलापूर
सेहरीची वेळ ५.२७ एएम
इफ्तारची वेळ ६.३५ पीएम
नागपूर
सेहरीची वेळ ५.१४ एएम
इफ्तारची वेळ ६.२१ पीएम












Click it and Unblock the Notifications