10 March 2025 Sehri-Iftar Time: सोमवारी ९ वा रोजा; वाचा प्रमुख शहरांतील सेहरी इफ्तारच्या वेळा
इस्लामिक कॅलेंडरच्या ९ व्या महिन्यात मुस्लिम लोक महिनाभर उपवास ठेवतात. या महिन्यात उपवास करणे हे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानले जाते. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेलेल मुस्लिम बांधव या संपूर्ण महिनाभर रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काहीही न खाता किंवा पिता राहतात. रमजानचा महिना चंद्रदर्शनानुसार २९ ते ३० दिवसांचा असतो. या काळात रोजच्या सेहरी व इफ्तारच्या वेळा या वेगवेगळ्या असतात. शिवाय त्या शहरांनुसारही बदलतात.

१० मार्च रोजी मुस्लिम बांधव नवव्या उपवासाच्या शुभेच्छा देतील. इस्लाममध्ये रमजान महिन्यात उपवास करणे अनिवार्य मानले जाते. उपवास सकाळी सेहरीने सुरू होतो आणि इफ्तारने संपतो. सेहरी आणि इफ्तारची एक निश्चित वेळ असते. येथे आम्ही तुम्हाला १० मार्च रोजी उपवास ठेवण्याची आणि सोडण्याची वेळ सांगू. १० मार्च २०२५ चा सेहरी-इफ्तारचा वेळ जाणून घ्या.
महाराष्ट्रातील १० मार्चच्या सेहरी-इफ्तारच्या वेळा
मुंबई
सेहरीची वेळ- ५.३७ एएम
इफ्तारची वेळ- ६.४८ पीएम
पुणे
सेहरीची वेळ- ५.३३ एएम
इफ्तारची वेळ- ६.४४ पीएम
नागपूर
सेहरीची वेळ- ५.१३ एएम
इफ्तारची वेळ- ६.२१ पीएम
नाशिक
सेहरीची वेळ- ५.३४ एएम
इफ्तारची वेळ- ६.४३ पीएम
संभाजीनगर
सेहरीची वेळ- ५.२८ एएम
इफ्तारची वेळ- ६.३७ पीएम












Click it and Unblock the Notifications