Ram Navami Wishes in Marathi :'राम सर्वस्व आहे..' राम नवमीनिमित्त मित्रांना पाठवा खास शुभेच्छा
Ram Navami 2025 wishesh in Marathi : चैत्र महिन्यात राम नवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. या वर्षी रामनवमीचा सोहळा 6 एप्रिल रोजी साजरा केला जातोय. या प्रसंगाला आणखी खास बनवण्यासाठी, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना या दिवसाच्या शुभेच्छा पाठवून रामनामाचा गजर करत हा सोहळा अधिक द्विगुणित करू शकता.
चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी, देशभरात रामनवमी उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. 'श्रीराम' हा शब्द उच्चारताच भाव जागृत होतो आणि देहपान हरपते. श्रीराम या उच्चारातच शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव यांची प्रचीती येते.
भगवंताचा त्रेतायुगातील अवतार म्हणजे प्रभु 'श्रीराम' ! रामनवमी निमित्त तुम्ही नातवाईकांना, आप्तस्वकीयांना, मित्र-मैत्रिणांना शुभेच्छा संदेश नक्की पाठवा. तुमच्यासाठी रामनवमीनिमित्त खास शुभेच्छा संदेश ! वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे...
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद,
सौभाग्याने भरलेले राहू द्या.
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे...
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
युद्धामुळे सोन्याच्या दराचा भडका! 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.63 लाखांच्या पार; पहा मुंबई-पुण्यातील रेट -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा











Click it and Unblock the Notifications