आज राम मंदिर प्रतिष्ठाची पहिली वर्षगाठ, पाठवा तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश
Ram Mandir Varshganth Wishes: आज राम मंदिर प्रतिष्ठाची पहिली वर्षगाठ आहे म्हणजेच पहिला वर्धापन दिन आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार आज एक वर्ष पूर्ण झाले आहे परंतु मराठी कॅलेंडरनुसार भगवान रामची प्राण प्रतिष्ठा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला 11 तारखेला करण्यात आली होती. म्हणून, या दिवशी राम मंदिर अयोध्येचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिराची पहिला वर्धापन दिन ही केवळ एक ऐतिहासिक कामगिरी नाही तर भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा उत्सव देखील आहे, परंतु इंग्रजी तारखेनुसार आज अयोध्येतील राम मंदिराची पहिली वर्धापन दिन आहे. म्हणून राम भक्त हा दिवस पूर्ण आनंदाने आणि भक्तीने साजरा करत आहेत. आजचा हा दिवस अजून खास बनवण्याकरिता येथे आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

राम मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, तुमच्या प्रियजनांना हे शुभेच्छा संदेश पाठवा
लोचन अभिरामा, तनु घनस्यामा, निज आयुध भुजचारी।
भूषन बनमाला, नयन बिसाला, सोभासिंधु खरारी॥
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापण सोहळ्याच्या शुभेच्छा..!
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी...
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा!
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या मनात श्रीराम आहे
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा!
छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक बाणी, एक वचनी,मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा!
DISCLAIMER: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सुचना आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया मराठी लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications