18 किलो सोन्याचे 14 दरवाजे..! आयोध्येच्या राम मंदीराची 'श्रीमंती' वाढणार; काम कधी पूर्ण होणार? वाचा
दीर्घ प्रतिक्षेनंतर आयोध्येतील राम मंदीराचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. परंतु अजूनही काही काम सुरुच आहे. हे राम मंदीर तीन मजली असून आता पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन करण्याचे काम सुरु आहे. या पहिल्या मजल्याला दरवाजे बसविण्याचे काम सध्या सुरु असून त्यानंतर राम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे.

बसविणार सोन्याचे दरवाजे
राम मंदीराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार तयार करण्यात येणार आहे. या पहिल्या मजल्यावर एकूण १४ दरवाजे बसविण्यात येणार आहेत. त्यातील सहा दरवाजे हे सोन्याचे असतील. हे सहा दरवाजे तयार करण्यासाठी तब्बल १८ किलो सोने वापरण्यात आले असून हे दरवाजे आता तयार झाले आहेत. ते दरवाजे बसविण्याचे काम सध्या सुरु आहे.
कसे आहेत सोन्याचे दरवाजे?
हे सोन्याचे दरवाजे १२ फूट उंच व ८ फूट रुंद आहेत. या दरवाज्यावर सुरुवातीला तांब्याच्या प्लेट चिटकविण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला. तीन मजली राम मंदीराला एकूण ४६ दरवाजे आहेत. त्यापैकी ४२ दरवाज्यावर १०० किलो सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. आता पहिल्या मजल्यावरील सहा दरवाजे पूर्ण सोन्याचे असणार आहेत. या दरवाजांना प्रत्येकी तीन किलो सोने वापरले गेले आहे.
कधी पूर्ण होणार काम?
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराची मूर्ती स्थापित करण्याचा शुभ मुहूर्त निश्चित झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जयपूरहून मूर्ती अयोध्येत आणल्या जातील. यानंतर जूनमध्ये पुतळा बसवला जाईल. जून महिन्यापासून रामभक्तांना रामलल्लासोबत राम दरबाराचे दर्शन घेता येईल. राम मंदिर शहरी शैलीत बांधले गेले आहे. मंदिराच्या सर्व खांबांवर आणि भिंतींवर देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातून नेले लाकूड
महाराष्ट्रातून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवलेल्या दरवाज्यांचे वय १००० वर्षे असल्याचे म्हटले जाते. या दरवाजाला आकार देण्यासाठी, हैदराबादमधील कारागीर अयोध्येत तैनात करण्यात आले आहेत. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर दरवाजा बसवल्यानंतर येथे राम दरबार स्थापन केला जाईल. हे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications