Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्षगाठ ; अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी, पहा व्हिडिओ

Ram Mandir Pran Pratistha Ceremony: आज अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठाची प्रथम वर्षगाठ आहे. या खास प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य पूजा विधीनंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

हिंदू कॅलेंडरनुसार आज 11 जानेवारी 2025 रोजी 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी हा पवित्र कार्यक्रम पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील कूर्म द्वादशीच्या दिवशी झाला होता आणि यावर्षी शुक्ल पक्ष 11 जानेवारी रोजी आहे.

ram Mandir

यानिमित्ताने राम मंदिराच्या परिसरात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 11 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात अग्निहोत्राने शुक्ल यजुर्वेदाच्या मंत्रांनी सकाळी 8 ते 11 आणि नंतर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत होईल. यानंतर 6 लाख श्रीराम मंत्रांचा जप आणि रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे.

हा कार्यक्रम दुपारी 3 ते 5 या वेळेत होईल

मंदिराच्या तळमजल्यावर दुपारी 3 ते 5 या वेळेत 'राग सेवा' आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शुभेच्छा गीत सादर केले जाईल. त्याचप्रमाणे, पहिल्या मजल्यावर संगीतमय मानस पठण होईल. मंदिर संकुलातील 'अंगद टीला' येथे रामकथा आयोजित केली जाईल, त्यानंतर मानस प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

22 जानेवारी 2024 रोजी झाली होती स्थापना

जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते 1 जानेवारी 2025 पर्यंत 2 लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे. राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते मुख्य पूजा विधी करुन पार पडला होता.

श्री रामजन्मभूमी मंदिर पारंपारिक नागर शैलीमध्ये बांधले गेले आहे. त्याची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. याला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर हिंदू देवी-देवतांचे सुंदर कोरीवकाम करुन आकर्षक पध्दतीने सजवलं आहे.

मुख्य गर्भगृहात भगवान श्रीरामाचे बालरूप (रामललाची मूर्ती) स्थापित करण्यात आली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येत लाखो भाविक भेट देत आहेत. हनुमानगढी राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही दररोज झपाट्याने वाढत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+