Raksha Bandhan : भावा-बहिणीचा सण रक्षाबंधन, WhatsApp Status, Facebook द्वारे पाठवा शुभेच्छा संदेश!
Raksha Bandhan 2025 Wishes in Marathi : बहिण- भावामधील प्रेम दृढ करणारा सण रक्षाबंधन. ओवाळीते मी भाऊराया... वेड्या बहिणीची वेडी ही माया...! असं म्हणतं बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन या दिवशी मागते. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 9 ऑगस्टला शनिवारी साजरा केला जात आहे. यासणानिमित्त आपल्या लाडक्या भावासाठी आणि बहिणीसाठी स्टेटसवर ठेवा सुंदर शुभेच्छा मेसेज अन् एकमेकांना द्या खास शुभेच्छा...!

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!
"बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती..
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती..
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा"
"ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा"
तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,
तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
कुठल्याच नात्यात नसेल एवढी बहिण भावाचच्या प्रेमात ओढ आहे
म्हणुनच भाऊ बहिणीच हे नात जगात खुप-खुप गोड आहे
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली.
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक धागा, एक विश्वास,
हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्यावरचा
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications