Raksha Bandhan 2025 Date and Muhurta : रक्षाबंधन सण कधी आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे?
Raksha Bandhan 2025 Date and Muhurta : रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याचा अंत्यत महत्वाचा दिवस. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि भाऊ तिच्या रक्षण करतो. भाऊ आणि बहिणींच्या नात्याच्या उत्कटतेचा दिवस आहे. कुणी या सणाला नारळीपौर्णिमा, कुणी राखीपौर्णिमा तर कुणी रक्षाबंधन म्हणतात.
काही लोकांमध्ये ८ ऑगस्ट की ९ ऑगस्ट या तारखेबद्दल संभ्रम आहे, कारण पौर्णिमा तिथी दोन दिवस आहे. मात्र, रक्षाबंधनाच्या सणासाठी उदय तिथी महत्त्वाची असते, त्यामुळे ९ ऑगस्ट रोजीच राखी बांधणे शुभ मानले जाईल.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता?
९ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५:४७ पासून दुपारी १:२४ पर्यंत आहे. हा दिवस सर्वार्थ सिद्धी योगात साजरा केला जाईल.
रक्षाबंधनाचे महत्त्व
रक्षाबंधन हा सण केवळ एका धाग्याचा नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक आहे.
धार्मिक महत्त्व: महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाल्यावर तिच्या साडीचा तुकडा बांधला होता. या बदल्यात श्रीकृष्णाने तिच्या रक्षणाचे वचन दिले.
रक्षाबंधनाचे ऐतिहासिक महत्त्व: चित्तोडची राणी कर्णावतीने बहादुर शहापासून संरक्षणासाठी मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवली होती. हुमायूनने या राखीचा आदर करत राणीला मदत केली.
रक्षाबंधन साजरे करण्याची पद्धत
या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला टिळा लावते आणि त्याची आरती करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी घरात गोड पदार्थ आणि मिठाई बनवल्या जातात आणि पूजा करून दिवसाची सुरुवात होते.
टीप: ही माहिती धार्मिक मान्यता आणि पंचांगानुसार दिली आहे. कोणतीही धार्मिक विधी करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा पंडितांचा सल्ला घेणे योग्य राहील.












Click it and Unblock the Notifications