Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Raksha Bandhan 2025 लाडक्या भाऊरायाला राखी बांधताय? तुमच्या राशीनुसार निवडा राखीचा रंग आहे खास महत्व

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सण. या दिवशी भाऊरायाला लाडकी बहिण ओवाळते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची हमी घेतो. हा सण पुर्वापार चालत आलेला आहे. याला एक महत्व असून संस्कृतीचा संगम असलेला हा सण आहे. हा केवळ एक सण नसून तो भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो आणि प्रत्येक ग्रहाचे आवडते रंग वेगवेगळे असतात. जर बहिणींनी भावाच्या राशीनुसार योग्य रंगाची राखी निवडली, तर ती त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणू शकते.

Raksha Bandhan 2025

12 राशींनुसार राखीचे शुभ रंग

मेष : मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीसाठी लाल, पिवळा, हिरवा आणि सोनेरी रंग खूप शुभ आहेत. या रंगांची राखी भावामध्ये ऊर्जा आणि उत्साह वाढवते.

वृषभ : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या भावांसाठी पांढरा, आकाशी, सोनेरी आणि फिकट पिवळा रंग शुभ आहे. हे रंग त्यांच्या आयुष्यात शांतता आणि स्थिरता आणतात.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. हिरवा रंग या राशीसाठी खूप शुभ मानला जातो. यासोबतच निळा आणि सोनेरी रंगाची राखी देखील सौभाग्यदायक आहे.

कर्क : या राशीचा स्वामी चंद्र आहे. पांढरा आणि फिकट पिवळ्या रंगाची राखी भावाच्या जीवनात भावनिक संतुलन आणि समृद्धी आणते.

सिंह : सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. लाल, नारंगी, गुलाबी आणि सोनेरी रंगाची राखी भावाचा आत्मविश्वास वाढवते.

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध आहे. पिस्ता ग्रीन, गुलाबी, पिवळा आणि सोनेरी रंग शुभ आहेत. हे रंग मानसिक स्पष्टता आणि प्रगतीसाठी कारणीभूत ठरतात.

तुला : तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. फिकट पिवळा, पांढरा आणि निळा रंग या राशीच्या भावांसाठी सौहार्द आणि संतुलन आणतात.

वृश्चिक : या राशीचा स्वामी मंगळ आहे. लाल, हिरवा आणि पिवळा रंग शुभ आहेत. हे रंग भावाला आत्मविश्वास आणि धैर्य देतात.

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु (बृहस्पति) आहे. पिवळा, केशरी आणि सोनेरी रंग भावासाठी सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक आहेत.

मकर : या राशीचा स्वामी शनि आहे. निळा आणि मिश्रित (मल्टी-कलर) रंगाची राखी उत्तम मानली जाते. हे रंग भावाला स्थिरता आणि शिस्त देतात.

कुंभ : कुंभ राशीसाठी निळा, गडद निळा आणि काळा रंग विशेष फलदायी असतो. या रंगांची राखी भावाच्या विचारात आणि दृष्टिकोनात गांभीर्य आणते.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु आहे. पिवळ्या आणि सोनेरी रंगाची राखी या राशीच्या भावांसाठी अत्यंत शुभ असते. हे रंग आध्यात्मिक प्रगती आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत.

Disclaimer : या लेखात नमूद केलेले रत्नांचे फायदे पारंपारिक श्रद्धा आणि ज्योतिषीय अनुभवांवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम वेगळा असू शकतो. कोणतेही रत्न घालण्यापूर्वी, पात्र ज्योतिषी किंवा रत्नशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या. हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय मानू नये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+