भारताला मुस्लिम राष्ट्र करण्याचा डाव NIA ने उधळला; जकातच्या पैशातून दिले जात होते अतिरेकी प्रशिक्षण
बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या १२० हून अधिक ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) काल छापे टाकले. राजस्थानमधील या छाप्यात एनएआयने अनेक धक्कादायक खुलासे केले. छापे घालण्यात आलेल्या पीएफआय कार्यालयात दहशतवादी तयार केले जात असल्याचे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

NIA ने केले धक्कादायक खुलासे
एनआयए दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. पीएफआयच्या सदस्यांना त्यांच्या गावांत शिबिरे चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली तरुणांना शस्त्रे आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले जात होते. ही दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे जकातच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशातून चालवली जात होती. या प्रशिक्षण वर्गात गुजरात दंगली किंवा इतर दंगलीचे प्रक्षोभक व्हिडिओ दाखवून तरुणांचे ब्रेनवाॅश केले जात होते. या प्रशिक्षण शिबिरात २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यावर भर देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप एनआयने आरोपपत्रात केला आहे.
प्रक्षोभक व्हिडिओ दाखवून ब्रेनवॉशिंग
या छाप्यात एनआयएला अनेक पुरावे सापडले आहेत. या कार्यकर्त्यांच्या फोनमधून बरेच फोटो आणि व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. पुरुष आणि महिला एअरगन हातात धरतानाचे व्हिडीओही जप्त कले आहेत. काही आक्षेपार्ह फोटोही जप्त करण्यात आले आहेत. पीएफआयचा ध्वज आणि आझादी महोत्सवाचे पोस्टर एनआयएच्या टीमने जप्त केले. पीएफआयच्या शाळेत तरुणांना प्रक्षोभक व्हिडिओ दाखवून २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यावर भर देण्यात आल्याचा दावा एनआयएने केला आहे.
पाच आरोपींना अटक
जयपूरमधील पीएफआय मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या पाच आरोपींपैकी एक असलेल्या मोहम्मद आसिफच्या मोबाईल फोनमधून एक फाइल जप्त करण्यात आली आहे. या फाईलचे नाव tilecache.l_embedded_469 होते. योग आणि आखाड्याच्या नावाखाली या प्रशिक्षण शिबिरांमध्ये तरुणांना शस्त्रे हाताळणी आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले जात होते. यासोबतच, तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना धोकादायक हेतूंसाठी तयार केले जात होते. ब्रेनवॉशिंगनंतर, कार्यकर्त्यांना दोन भागात शारीरिक प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या भागात शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. तर दुसऱ्या भागांत तरुणांना विक पाँईंटवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
भारताला करायचे होते मुस्लिमराष्ट
पीएफआय कार्यकर्त्यांना भारत सरकार, हिंदू संघटना आणि इतर धार्मिक संघटनांविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे, हेच या प्रशिक्षण शिबिराचा उद्देश होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे. २०४७ पर्यंत भारतात मुस्लिम राजवट स्थापित करता येईल. २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राजवट स्थापित करण्याच्या त्यांच्या योजना राबवण्यासाठी त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) चा पाठिंबा आहे, असाही एनआयएचा आरोप आहे.
जकातच्या पैशातून खरेदी केली शस्त्रे
एनआयच्या तपासादरम्यान जयपूर, कोटा, सवाई माधोपूर, भिलवाडा आणि बुंदीसह पीएफआय सदस्यांच्या १२० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या दरम्यान चाकू, एअरगन, कुऱ्हाडी, आक्षेपार्ह डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपपत्रानुसार, पीएफआयने जयपूर येथील पंजाब नॅशनल बँकेत उघडलेल्या बँक खात्याचीही चौकशी करण्यात आली. २०११ ते २०२२ या काळात या खात्यात २,९८,४७,९१६.९९ रुपये जमा झाल्याचे आढळून आले, त्यापैकी २,९६,१२,४२९.५० रुपये काढण्यात आले. जकातच्या नावाखाली ही देणगी वसूल करुन तो पैसा शस्त्रे खरेदी करण्यासाठी, शस्त्र प्रशिक्षण शिबिरे चालवण्यासाठी आणि निवडक लोकांना लक्ष्य करण्यासाठी वापरले गेल्याचा आरोप एनआयएने केला आहे.












Click it and Unblock the Notifications