मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड
नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, असा निर्णय मंगळवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी (२५ जून) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

ज्यामध्ये राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय विरोधी पक्षनेतेपदासाठी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी केली होती.
#WATCH | Congress general secretary KC Venugopal says "Congress MP Rahul Gandhi has been appointed as the LoP in the Lok Sabha.." pic.twitter.com/llhssszwAV
— ANI (@ANI) June 25, 2024
यासोबतच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याच्या मागणीचा एकमताने पुनरुच्चार करण्यात आला. अशा परिस्थितीत आता नेत्यांचा आणि आघाडीतील पक्षांचा मान राखत राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा
नुकत्याच झालेल्या ५४३ सदस्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने २४० हून अधिक जागा जिंकल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील मित्रपक्षांसह भाजपने सरकार स्थापन केले. विरोधी पक्षांच्या घटक पक्षांपैकी काँग्रेसला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या.












Click it and Unblock the Notifications