राहुल गांधी महिलांसोबत भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे वाढलेले भाव ऐकून अवाक, पाहा VIDEO
Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहाण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रोज नवनवे प्रयोग करताना दिसतात. आज काहीसा असाच एक प्रयोग करत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत पोहोचले. भाजी खरेदीसाठी आलेल्या राहुल गांधींना भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव ऐकून धक्काच बसला.
खुद्द राहुल गांधींनी भाजी मंडईचा व्हिडिओ X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते महिलांसोबत दिल्लीच्या गिरीनगर भाजी मंडईत दुकानदारांसोबत भाजी खरेदी करताना दिसत आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी सरकारची उडवली खिल्ली
खा. राहूल गांधी यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीया अंकाऊंटवर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की- एकेकाळी लहसून 40 रुपये प्रति किलो होता, आज 400 रुपये प्रति किलो झाले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले - सरकार कुंभकरणासारखे झोपले!
“लहसुन कभी ₹40 था, आज ₹400!”
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2024
बढ़ती महंगाई ने बिगाड़ा आम आदमी की रसोई का बजट - कुंभकरण की नींद सो रही सरकार! pic.twitter.com/U9RX7HEc8A
भाजी मंडईत लसणाचा भाव 400 रुपये किलो आहे, हे ऐकून राहुल गांधी भाजी विक्रेत्याकडे टक लावून पाहत आहेत, तर त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या महिलेने सोने घेणे चांगले आहे. दरम्यान, कोबी, वाटाणा, कांदा आणि बटाटे या हंगामी भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी चिंतेत दिसले.
राहुल गांधींनी भाजी मंडईत महिलांशी संवाद साधला आणि त्यानंतर कदाचित आता राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारला जाग येईल आणि भाव कमी करतील, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications