प्रियांका गांधींनी उमेदवारी अर्ज भरताना मल्लिकार्जुन खरगेंना बाहेर उभं केलं? BJPकडून VIDEO पोस्ट!
Priyanka Gandhi : भारतीय जनता पार्टीचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्यासह काही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एकच व्हिडिओ सध्या पोस्ट होताना दिसत आहे. यात वायनाड येथे मल्लिकार्जून खर्गे यांना दरवाजाबाहेर ठेवून प्रियंका गांधी यांनी कसा आपला उमेदवारी अर्ज भरला हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न या व्हिडिओतून दिसत आहे. मात्र काँग्रेसकडून या व्हिडिओसंदर्भात अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
वायनाडमध्ये काल प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत मोठी रॅली काढली व त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरतेवेळी मल्लिकार्जून खर्गे काहीकाळ प्रियांका गांधींसोबत होते त्यानंतर ते बाहेर गेले. पण याच प्रसंगावरचा व्हिडिओ भाजपच्या पदाधिकारी, नेत्यांकडून पोस्ट करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत?
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणआत शेअर करताना दिसत आहेत. या व्हिडीओत दिसतंय की खरगे एका कार्यालयाच्या दरवाजाबाहेर उभे आहेत, कार्यालयाचा दरवाजा थोडासा उघडला आहे आणि ते त्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दरवाजाजवळ एक व्यक्ती उभी आहे, जिच्यामुळे दरवाजाबाहेर उभे असलेले काँग्रेस अध्यक्ष आत जाऊ शकत नाहीत असे दिसते. खरगेंचा हा व्हिडीओ भाजपा नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत आणि दावा करण्यात आला की, प्रियांका गांधी लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना बाहेर उभं केलं होतं. मात्र यासंदर्भात अधिकृत माहीती नाही.
It’s deeply disheartening to witness the disrespect shown towards a veteran Parliamentarian and Dalit leader like Shri @kharge Ji by the so-called Holy Trinity in Wayanad today.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 23, 2024
Whether it’s the President of AICC or PCC, does the Family take pride in humiliating those they treat… pic.twitter.com/FCnKOloaxz
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी नुकताच वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना खरगे मात्र बाहेर उभे होते असा दावा करणारा व्हिडीओ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी देखील एक्सवर शेअर केला आहे. प्रियांका गांधींनी खरगेंचा अपमान केल्याचा आरोप भाजपा नेते करत आहेत. काँग्रेसमध्ये केवळ गांधी कुटुंबालाच सन्मान मिळतो, असंही भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे.
हिमंता बिस्व सरमा यांची पोस्ट
हिमंता बिस्व सरमा यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की "मल्लिकार्जून खर्गे यांच्यासारख्या दिग्गज संसदपटूबद्दल दाखवण्यात आलेला अनादर पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. हे सर्व पाहून वाईट वाटतं. पक्षातील इतक्या वरिष्ठ नेत्याशी चाललेला हा व्यवहार पाहून यातना होतात. " असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रीया नाही
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. काही प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले की, मल्लिकार्जुन खरगे सुरुवातीला प्रियांका गांधींबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होते. मात्र, काही वेळाने ते बाहेर गेले.
वायनाडमध्ये काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
1. वायनाडचे लोक मदतगार: भूस्खलनादरम्यान एक गोष्ट लक्षात आली. इथे डॉक्टर, शिक्षक, गृहिणी, सगळे एकमेकांना मदत करण्यात व्यस्त होते. ते एकमेकांना सहानुभूतीने, प्रेमाने, आपुलकीने आणि हिंमतीने कोणताही लोभ न ठेवता साथ देत होते. आपल्या कुटुंबाचा एक भाग असणे हा एक विशेषाधिकार आहे.
2. भूस्खलनात कुटुंबे गमावलेल्या लोकांची भेट: वायनाडमधील चुरमला आणि मुंडक्काई येथे भुसख्खलनानंतर मी माझ्या भावासोबत (राहूल गांधी) भेट दिली होती. मी माझ्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला. मी अशी मुले पाहिली ज्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले. मी अशा मातांना भेटलो ज्यांनी आपली मुले गमावली, ज्यांचे संपूर्ण आयुष्य भूस्खलनात वाहून गेले.
3. सत्तेवर आलेल्यामध्ये द्वेषभावना : जे सत्तेत आहेत त्यांनी सत्तेत राहण्यासाठी द्वेषाचा वापर केला. त्यांनी तेढ निर्माण केली. हे आपले राष्ट्र ज्या राजकारणावर बांधले गेले ते नाही. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आपली स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक धर्माच्या समानतेने आणि आदराने प्रेरित होती.
4. सत्य आणि न्यायासाठी आमचा लढा: येशू ख्रिस्त आपल्याला नम्रतेबद्दल शिकवतात. बुद्धाची शिकवण आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवते. आज आपण राष्ट्रवादाच्या या मूल्यांसाठी लढत आहोत. आम्ही सत्य, न्याय आणि समतेसाठी लढत आहोत. या मूल्यांनी माझ्या भावाला भारतभर प्रेम आणि एकात्मतेसाठी चालण्याची प्रेरणा दिली.












Click it and Unblock the Notifications