अमित शहांचा निषेध व्यक्त करण्यासाठी, प्रियंका व राहुल गांधींचे कलर वाँर; संसदेत नेमके काय झाले..?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कालच्या वक्तव्यावरुन आज चांगलेच वातावरण तापले. अखेर राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज राहुल गांधी व प्रियंका गांधी निळ्या रंगाच्या कपड्यात संसदेत दाखल झाले.

गांधी कुटुंबाचा ड्रेस कोड
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी उद्योगपती अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरूनही विरोधक चांगलेच तापले. केंद्रीय गृहमंत्र्यांवर विरोधकांचा कालपासून हल्लाबोल सुरू झाला आहे. राजधानी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात आणि महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही आज निळे वादळ दिसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निळ्या रंगाचा टीशर्ट घालून संसदेत आले होते. त्यामुळे चर्चा सुरु होती तर दुसरीकडे प्रियंका गांधीही निळ्या रंगाची साडी नेसलेल्या दिसल्या. निळा रंग हा आंबेडकर आणि दलित विचारांचे प्रतिक मानण्यात येते. त्यामुळेच अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी गांधी कुटुंबाने घातलेला एकाच रंगाचा ड्रेस आज चर्चेचा विषय ठरला.
#WATCH | Delhi | INDIA bloc holds protest march at Babasaheb Ambedkar statue in the Parliament complex
— ANI (@ANI) December 19, 2024
They will march to Makar Dwar, demanding an apology and resignation of Union Home Minister Amit Shah over his remarks on Babasaheb Ambedkar in Rajya Sabha. pic.twitter.com/4cmM90DWpY
शहांच्या राजीनाम्याची मागणी
संसदेत आंबेडकरांचा अपमान करण्यात आला, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या, डाँ. आंबेडकरांविषयी ट्विटर हँडलवरही काहीही लिहिण्यात आले आहे. संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. भाजपच्या लोकांवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, काल राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात विरोधाची लाट उसळली. आता इंडिया आघाडीने या वक्तव्याप्रकरणी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीनेही आंदोलन केले आहे.












Click it and Unblock the Notifications