नियंत्रण सुटल्याने बस पुलाला धडकली, 7 जण जागीच ठार, 30 जणांची प्रकृती गंभीर; दिवाळीतच काळाचा घाला
दिवाळीच्या काळातच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला. मंगळवारी एक मोठा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनियंत्रित बस पुलावर जाऊन आदळली. त्यानंतर बस उलटली आणि त्यात बसलेल्या सात जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आसपासच्या लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींना लक्ष्मणगड आणि सीकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. लक्ष्मणगड येथील कल्व्हर्टजवळ हा अपघात झाला. सालासरहून लक्ष्मणगडकडे येणारी खासगी बस कल्व्हर्टला धडकली.
सीकर के लक्ष्मणगढ़ क्षेत्र में बस दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद एवं हृदयविदारक है। मेरी गहरी संवेदनाएं मृतकों के शोकसंतप्त परिवारजनों के साथ हैं।
— Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) October 29, 2024
संबंधित अधिकारियों को घायलों का समुचित उपचार सुनिश्चित करने हेतु निर्देशित किया गया है।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि…
मिळालेल्या माहितीनुसार, बस कल्व्हर्टच्या भिंतीला धडकली आणि चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला. धडकेनंतर बसमध्ये गोंधळ उडाला. यानंतर लोकांची गर्दी जमली आणि एक एक करून सर्वांना जवळच्या लक्ष्मणगड शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

माहिती मिळताच सीकरचे जिल्हाधिकारी मुकुल शर्मा, एसपी भवनभूषण यादव, सिटी डीएसपी (आयपीएस) शाहीन सी आणि एडीएम रतन कुमार घटनास्थळी पोहोचले.












Click it and Unblock the Notifications