Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रंतप्रधान मोदींच्या हस्ते नमो हाॅस्पिटलचे उद्धघाटन; ठरले एआय पावर युक्त पहिले रोबोट रुग्णालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासामधील नमो हॉस्पिटलचे पहिल्या चरणाचे उद्घाटन केले. 450 बेड असलेले आणि सुमारे 460 कोटी रुपये खर्चून हे हाँस्पिटल तयार करण्यात आले आहे. या भागातील रुग्णांना येथे अध्यायावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या रुग्णालयाच्या उद्धाटनप्रसंगी पंतप्रधानांनी 2500 कोटी रुपयांची जनकल्याणकारी प्रकल्पांचेही उद्घाटन केले. यामध्ये नवीन रुग्णालय, शाळा आणि नागरी सुविधांसह तातडीच्या आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांचा समावेश होता.

Prime Minister Modi inaugurates Namo Hospital

मोदींनी केले कौतूक

नमो हाँस्पिटलच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावित रुग्णालयाच्या (3D) थ्री डी मॉडेलचा आढावा घेतला. अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी टीमचे कौतुक केले. Misso चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक शाहनी भरतात बनलेले सर्वात पहिले एआय- पावर युक्त रोबोटिक नी- रिप्लेसमेंट सर्जरी यंत्रणा या कार्यक्रमात सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.

काय म्हणाले विवेक शहा?

या कार्यक्रमात बोलताना रेरिलचे सीईओ विवेक शहा यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, "Meril येथे काम करत असताना, आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहोत, हे असे तंत्रज्ञान आहे जे केवळ शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर त्याचे क्लिनिकल परिणाम हे रुग्णास जलद गतीने बरे होण्यास मदत करतात. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवास होतो आहे आणि त्यामध्ये Misso हा अभिमानास्पद टप्पा आहे." ते पुढे म्हणाले की, हे नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतातील सांध्याच्या शस्त्रक्रियांसाठी एक क्रांतिकारक पाऊल असेल, ज्यामध्ये अचूकता आणि रुग्ण जलद गतीने बरे होण्यास मदत मिळेल.

मिळणार जागतिक आरोग्यसेवा

पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये समाधान व्यक्त केले. उच्च दर्जाची आरोग्य सेवा अधिक सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नमो हॉस्पिटलचे उद्घाटन हे भारताच्या वैद्यकीय यंत्रणेला बळकटीस देण्यासंदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्याच्या देशाच्या वचन पद्धतीला त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+