Mahakumbh 2025: महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेचा अनोखा उपक्रम,जॅकेटपासून तिकीट, क्यूआर कोडने होणार बुकिंग
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ 2025 ला दिव्य आणि भव्यतेने डिजिटल महाकुंभ बनवण्याचा संकल्प केला आहे. भारतीय रेल्वे या दिशेने एक अनोखा पुढाकार घेणार आहे. प्रयागराज रेल्वे बोर्ड महाकुंभात प्रथमच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेटमधून डिजिटल रेल्वे तिकीट बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
या उपक्रमामुळे महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांना तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. याशिवाय रेल्वे प्रशासनालाही तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत काहीसा दिलासा मिळणार आहे. याशिवाय भारतीय रेल्वेने यापूर्वीच टोल फ्री क्रमांक, वेबसाइट आणि महाकुंभ मेळा ॲप जारी करून डिजिटल महाकुंभ यशस्वी करण्यासाठी अर्थपूर्ण प्रयत्न केले आहेत.

जॅकेटवरील QR कोड स्कॅन करून काढा रेल्वे तिकीट
महाकुंभ 2025 लक्षात होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्तर मध्य रेल्वेने प्रयागराजला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
याबाबत बोलताना प्रयागराज रेल्वे विभागाचे वरिष्ठ पीआरओ अमित मालवीय म्हणाले की, महाकुंभ दरम्यान रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे कर्मचारी प्रयागराज जंक्शनवर हिरवे जॅकेट परिधान करून विशेष कर्तव्यावर तैनात असतील. या जॅकेटच्या मागील बाजूस एक QR कोड छापलेला असेल, जो भाविक त्यांच्या मोबाइलवरून स्कॅन करू शकतात आणि थेट UTS मोबाइल ॲप डाउनलोड करू शकतात. हे ॲप प्रवाशांना रांगेत उभे न राहता अनारक्षित तिकीट बुक करण्याची सुविधा देईल.
तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही
प्रयागराज रेल्वे बोर्डाच्या या उपक्रमामुळे रेल्वे स्थानकावरील लांबलचक रांगा टाळून भाविकांना सहज तिकीट काढता येणार आहे. डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट बुक करण्याच्या या प्रक्रियेमुळे वेळेची तर बचत होणार. तसेच महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना तिकीटाच्या लाईनच्या समस्येपासून दूर ठेवता येणार आहे.
वरिष्ठ पीआरओ म्हणाले की, रेल्वेच्या आवारात विविध महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी QR कोड असलेली जॅकेट घालून तैनात करण्यात येणार आहेत, जेणेकरून भाविकांना तिकीट सहजपणे बुक करता येईल. याशिवाय प्रवाशांना क्यूआर कोडद्वारे तिकीट बुकिंग तसेच इतर सुविधांचा लाभ घेता येणार आहे.












Click it and Unblock the Notifications