प्रसारभारतीचे 'WAVES' OTT ॲप लाँच! 40 Live चॅनल, लाइव्ह इव्हेंट मोफत, नेटफ्लिक्सशी देतेय टक्कर!

Prasar Bharati's new OTT Waves : प्रसार भारती नेहमी बदलत्या काळानुसार, बदल करत आली आहे. खासगी प्रसारमाध्यमांशी स्पर्धा करत करत प्रसारभारतीच्या सर्व प्लॅटफाॅर्मला आजही लोकांची चांगलीच पसंती आहे.आता ओटीटीसारखा प्लॅटफाॅर्मही प्रसारभारतीने लाँच केला आहे.

रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हमलोग सारखे गतकाळातील टीव्ही शोचा संग्रहासह हे व्यासपीठ भारताच्या भूतकाळाशी प्रेक्षकांचे सांस्कृतिक आणि भावनिक भावबंध जोपासना करेल. याव्यतिरिक्त, बातम्या, माहितीपट आणि प्रादेशिक कंटेंटही या प्लॅटफाॅर्मवर असेल. प्रसार भारतीने यूएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसह 40 लाइव्ह चॅनेल, लाइव्ह इव्हेंटसह फ्रि 'वेव्हज' हे OTT ॲप लाँच केले आहे. Wave या प्लॅटफॉर्मवर जवळपास 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असतील. सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म असताना प्रसारभारतीचा व्हेव्हज नेटफ्लिक्स-जिओ सिनेमाशी स्पर्धा करेल का? हे आता बघायचे आहे.

Prasar Bharati s new OTT Waves

'प्रसार भारतीने इफ्फीमध्ये केला WAVES OTT प्लॅटफॉर्म लॉन्च

प्रसार भारतीने आपल्या एक्स खात्यावर पोस्ट करून OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याविषयी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये प्रसारभारतीतर्फे नमूद करण्यात आलं की, 'प्रसार भारतीने इफ्फीमध्ये WAVES OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे! जुना कंटेंट आणि सध्याच्या कंटेंटचे समृद्ध मिश्रण करून प्रगत डिजिटल ट्रेंडनुसार चांगला कंटेंट देणं हा या प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) उद्घाटन समारंभात प्रसार भारतीच्या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारकांच्या OTT व्यासपीठ 'WAVES' लाँच केले आहे . दूरदर्शन, भारतातील प्रतिष्ठित सार्वजनिक प्रसारक, डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी OTT (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म स्पेसमध्ये प्रवेश केला आहे.

रामायण महाभारत बघायला मिळणार

रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हम लॉग सारखे कालातीत शो दाखवणाऱ्या लायब्ररीसह, हे व्यासपीठ भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक संबंध शोधणाऱ्या प्रेक्षकांना आकर्षित करते. याव्यतिरिक्त, ते बातम्या, माहितीपट आणि प्रादेशिक सामग्री ऑफर करते, सर्वसमावेशकता आणि विविधतेसाठी त्याची वचनबद्धता अधिक मजबूत करते. आपल्या अनेक दशकांपासूनचा वारसा आणि राष्ट्रीय विश्वासाचा लाभ घेऊन, दूरदर्शनचे OTT प्लॅटफॉर्म पारंपारिक टेलिव्हिजन आणि आधुनिक स्ट्रीमिंगमधील अंतर भरून काढते, तंत्रज्ञान-जाणकार तरुण आणि जुन्या पिढीपर्यंत पोहोचते.

या 12 भाषेत ओटीटी चॅनलची सुविधा

हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ, गुजराती, पंजाबी, आसामी या बारांपेक्षा जास्त भाषा 'वेव्ह्स'मध्ये आहे. हे माहितीआणि मनोरंजनाच्या ( इन्फोटेनमेंट) 10+ प्रकारांमध्ये याचे जाळे आहे. मागणीनुसार व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, लाइव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्रीसाठी ॲपमधील अनेक ॲप आणि डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ONDC) ऑनलाइन शॉपिंग प्रदान करेल.

WAVES वर काय काय बघायला मिळणार

WAVES मध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्ला आरती लाइव्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक मन की बात सारख्या थेट कार्यक्रमांचा समावेश आहे. आगामी यूएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 22 नोव्हेंबर, 2024 पासून WAVES वर थेट प्रसारित केली जाईल. WAVES CDAC, MeitY च्या भागीदारीत दैनिक व्हिडिओ संदेशांसह सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम देखील सुरू करेल. या मोहिमेला सायबर क्राइम की दुनिया (एक काल्पनिक मालिका) आणि सायबर अलर्ट (डीडी न्यूज वैशिष्ट्यांद्वारे) यांसारख्या कार्यक्रमांचा पाठिंबा आहे.

प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची नेटफ्लिक्स-जिओ सिनेमाशी टक्कर

ओटीटीच्या या युगात, ओटीटी प्लॅटफॉर्मची भरपूर संख्या आधीच आहे. नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा, प्राईम व्हिडिओ, डिस्नेप्लस, हाॅट स्टार, झी-5, सोनी लाईव्ह, यासारखे OTT प्लॅटफॉर्म सदस्यत्वासह लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. अलीकडे जिओ सिनेमा आणि हाॅट स्टार एकत्र होऊन JioStar.com बनले आहेत. आता बाजारात प्रसारभारतीच्या व्हेव्हची एन्ट्री झाल्यानंतर या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी स्पर्धा वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+