टपाल विभागाची ज्ञान पोस्ट सेवा! भारतात कुठेही स्वस्तात पाठवा शैक्षणिक साहित्य, पुस्तकं अन् बरंच काही

Post Office's Gyan Post service launched : संवादक्रांती झाल्यानंतर टपाल विभागाचे काम कमी झाले आणि पत्रांद्वारे संदेश पाठवण्याऐवजी लोक आता अद्ययावत साधने जसे की, सोशल मिडिया, टेलिफोनचा वापर करत आहेत. याद्वारे संदेशाची देवाणघेवाण होत आहे, असतानाही पोस्टाचे अर्थात टपाल विभागाचे महत्व टिकून आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे काळासोबत टपाल विभाग बदलत आहे.

अलिकडे पोस्टाच्या विविध फायदेशीर योजना आहेत, त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळेच पोस्ट विभागात आजही लोकांचे काही न् काही काम पडतेच. अशातच पोस्टाने आता एक महत्वाकांक्षी योजनारुपी सेवा ज्ञान पोस्ट या नावाने आणली आहे. ज्यामुळे खासगी कुरीअरपेक्षा स्वस्तात तुम्हाला तुमची पुस्तकं पाठवता येणार आहे.

Post Office s Gyan Post service launched

काय आहे ज्ञान पोस्ट सेवा?

भारतीय डाक विभागाने ज्ञान पोस्ट योजना आणली आहे, या सेवेद्वारे तुमचे पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला भारतात कुठेही पाठवता येणार आहे आणि तेही परवडणाऱ्या दरात...पोस्ट विभागाने शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि ते अधिक सुलभ बनवण्यासाठी ही नवीन सेवा सुरू केली आहे.

1 मे 2025 पासून लागू झाली सेवा

  • टपाल खात्याची ज्ञान पोस्ट सेवा 1 मे 2025 रोजी लागू झाली आणि भारतातील सर्व विभागीय पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.
  • यासंबंधीची माहिती दळणवळण मंत्रालयाने 28 एप्रिल 2025 रोजीच्या राजपत्र अधिसूचनेत नमूद केली आहे. ही सेवा तुम्ही वापरु शकता.

काय आहे पुस्तके, शैक्षणिक साहित्य पाठवण्याचे दर?

ही सेवा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.

ज्ञान पोस्ट वस्तूंसाठी टपाल दर (लागू कर वगळता)

  • 300 ग्रॅम वजनापर्यंत 20 रुपये लागणार
  • 301 ते 500 ग्रॅमसाठी 25 रुपये दर आकारणार
  • 501 ते 1000 ग्रॅमाठी फक्त 35 रुपये लागतील.
  • 1001 ते 2000 ग्रॅमपर्यंत 50 रुपये लागतील
  • 2001 ते 3000 ग्रॅम वजनापर्यंत 65 रुपये लागणार
  • 3001 ते 4000 ग्रॅमवजनासाठी 80 रुपये लागणार
  • 4001 ते 5000 ग्रॅम वजनासाठी 100 रुपये दर लागतील.

ज्ञान पोस्टद्वारे कोणत्या प्रकारची पुस्तके पाठवू शकता?

विद्यार्थ्यांसाठी पत्रव्यवहार आणि नियमित अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रमात असलेली पुस्तके
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळे, सरकारची विद्यापीठे; सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आणि वैधानिक संस्था
देशाच्या संबंधित कायद्यानुसार जारी केलेली किंवा प्रकाशित केलेली सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाची साहित्य असलेली पुस्तके तुम्ही पाठवू शकता. विविध स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुकांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पाठवू शकता. यासह कोणत्याही भाषेतील प्रत्येक खंड, खंडाचा भाग किंवा विभाग, विद्यार्थ्यांसाठीच्या नोट्स पाठवू शकता.

नियतकालिके पाठवता येणार नाहीत

अपस्टाॅक डाॅट. काॅमनुसार, पुस्तके किंवा पॅकेटमध्ये नियमित अंतराने प्रकाशित होणारे कोणतेही प्रकाशन यामध्ये नियतकालीके, मासिके, जर्नल्स इत्यादी तसेच ज्यात व्यावसायिक जाहीराती आहेत अशा गोष्टी पाठवता येणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+