Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, 7 दिवसांसाठी अटक टळली
Pooja khedkar : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्याशी संबंधित वकिलांनी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला. आता या प्रकरणाची सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी होणार असून, तोपर्यंत पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम असेल.
दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरच्या वकिलांनी पूजा खेडकर फक्त महाराष्ट्रातच असल्याचे सांगितले. सध्या हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत आहे. संपूर्ण मीडियाचे लक्ष पूजा खेडकरवर आहे. अशा परिस्थितीत ती खूप दबावाखाली आहे. मीडियाच्या दबावाबाबत दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, तपास यंत्रणांवर कधीही दबाव नसतो. यूपीएससीच्या वकिलांनी सांगितले की, ती स्वत:मुळेच प्रसिद्ध झाली आहे. वकिलानीं पुढे सांगितले की, असे असेल तर तिने कोणतीही पत्रकार परिषद घेऊ नये.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत तिने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगितले होते. दिल्ली पोलिसांनी आपल्या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 2022 आणि 2023 मध्ये दिलेल्या नागरी सेवा परीक्षा वेगळे- वेगळे अपंगत्वाचे दाखले सादर केले. हे प्रमाणपत्र अहमदनगरमधील वैमेडिकल अथॉरिटीने जारी केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी पूजा खेडकरच्या अटकेला 5 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती, जी नंतर 26 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता उत्तर दाखल करण्यासाठी वकिलाने आणखी एका आठवड्याची मुदत मागितली असून, त्यामुळे पूजा खेडकरच्या अटकेला 4 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. अशाप्रकारे तिच्या अटकेला 26 सप्टेंबरच्या नियोजित तारखेपासून आणखी सात दिवसांनी स्थगिती देण्यात आली आहे.
यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता
यूपीएससीने 31 जुलै रोजी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती आणि तिला भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. पूजा खेडकरवर तिच्या अधिकारांचा गैरवापर करून CSE (नागरी सेवा परीक्षा) 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले, ज्यामध्ये आपली चुकीची ओळख सादर करणे देखील समाविष्ट होते.
यूपीएससीने पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर पूजा खेडकरने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. पूजा खेडकरने न्यायालयासमोर दिलेल्या उत्तरात दावा केला होता की, तिने यूपीएससीला तिच्या नावाबाबत कोणतीही फेरफार किंवा चुकीची माहिती दिलेली नाही.












Click it and Unblock the Notifications