PM Modi Jalgaon Rally:विधानसभेआधी भाजपची रणनिती! PM मोदी आज जळगावात लखपती दिदींशी संवाद साधणार
PM Modi Jalgaon Tour: राज्यात आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापुर्वी वातावरण निर्मिती करणं सुरु झालं असून लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढणार आहेत. आज पंतप्रधान मोदी जळगाव येथे येणार असून ते लखपती दिदींशी संवाद साधणार आहेत. यासह आज त्यांचा राजस्थानमध्येही दौरा आहे.
(PM Modi Jalgaon Tour)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज 'लखपती दीदीं'चा मेळावा होणार आहे. जळगाव विमानतळ परिसरातील बावीस एकर क्षेत्रात यासाठी भव्य वॉटरफ्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. भर पावसात प्रशासनाची मेळाव्याच्या तयारीसाठी कसरत सुरू आहे.

तयारी विधानसभेची
राज्यात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करणार आहे. साधारणतः सप्टेंबरच्या मध्यात ही घोषणा होऊ शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आतापासूनच महाराष्ट्रात विजयी पताका लावण्यासाठी रणनिती आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा हा त्याचेच द्योतक असून यानंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढणार आहेत. महाराष्ट्रासह आज पंतप्रधान राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.
I look forward to being in Jalgaon, Maharashtra, tomorrow, 25th August, to participate in the Lakhpati Didi Sammelan. During the programme, certificates will be handed over to 11 lakh Lakhpati Didis. This scheme is playing a key role in boosting women empowerment. A fund of Rs.…
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2024
I look forward to being in Jalgaon, Maharashtra, tomorrow, 25th August, to participate in the Lakhpati Didi Sammelan. During the programme, certificates will be handed over to 11 lakh Lakhpati Didis. This scheme is playing a key role in boosting women empowerment. A fund of Rs.…
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2024पंतप्रधानांचे ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव दौऱ्यावर एक ट्वीट केले आहे. "लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, उद्या, 25 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे."
सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर
जळगाव येथे आज सकाळी अकरा ते दुपारी एक यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावात मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसंच केंद्रीय पथक शुक्रवारी रात्रीच दाखल झाले असून ते सुरक्षेची खातरजमा करत आहे. काल सकाळी मेळावा जिथे होणार त्या परिसरासह विमानतळाची सुत्रे या यंत्रणांनी हाती घेतली आहेत.
शंभर लखपती दिदींशी संवाद
आज होणाऱ्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र व राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान देशभरातील शंभर लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. त्यादृष्टीने या लखपती दिदींना गुरुवारपासून शहरातील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
चोख सुरक्षाव्यवस्था
पंतप्रधानांच्या मेळाव्यात सुरक्षेची कोणतीही कसर ठेवली जाणार नसून त्या दृष्टीनं यंत्रणाही अलर्टमोडवर आहेत. मेळावास्थळी एक दिवस आधीच केंद्रीय यंत्रणांना विशिष्ट क्षेत्रात खासगी व्यक्तींना येण्यास बंदी घातली आहे. या मेळावा परिसरात ग्रामीण जीवनशैलीवर आधारलेली वस्ती साकारली जात आहे हे विशेष.. या वस्तीतील झोपड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, कलाकृतीसह अन्य उपक्रमांचे पंतप्रधानांसमक्ष सादरीकरण करण्यात येणार आहे.
-
LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications