Pm मोदींची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी भेट, पारंपरिक मराठी टोपी घालून केली बाप्पाची आरती
नवी दिल्ली : राज्यासह देशभरात गणेश गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसतोय. मग मुंबई असो वा राष्ट्रीय राजधानी दिल्ली किंवा देशाचे इतर कोणतेही क्षेत्र. गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दया गणपती पुजनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले. येथे पंतप्रधान मोदी यांनी गणपती बाप्पाची आरती केली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड त्यांचे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते.
पीएम मोदींनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा केली
पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजेला हजेरी लावली. एका व्हिडिओमध्ये चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना दास पंतप्रधान मोदींचे त्यांच्या घरी स्वागत करताना दिसत आहेत. यानंतर पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी पूजा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निवासस्थानी आयोजित पूजेमध्ये पंतप्रधानांनी पारंपरिक मराठी टोपी घातलेली दिसत आहे.

पारंपरिक मराठी टोपी घालून पंतप्रधान मोदींनी केली गणपती बाप्पाची आरती
पंतप्रधान मोदी एक दिवस आधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपुजेत सहभाग घेतला होता. दरम्यान बुधवारी पंतप्रधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी सरन्यायाधीशांनी संपूर्ण कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी अतिशय भक्तीमय वातावरण दिसून आले.
सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो.
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2024
भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो. pic.twitter.com/5jNA0i45Zb
देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. हा 10 दिवसांचा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. या निमित्ताने लोक घरोघरी गणपतीची पूजा करतात. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत बाप्पाला घरी आणून पूजा आरती करतात. यावेळी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत..
ठाकरे गटाते खासदार संजय राऊतांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मिडीया अंकाऊंटवर एक पोस्ट करत टीका केली आहे.
संविधान के घर को आग लगी
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2024
घरके चिरागसे….
१) EVM को क्लीन चीट
२) महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख
३) प. बंगाल बलात्कर मामले मे suemoto हस्तक्षेप लेकीन
महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं.
४) दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के
bail पर तारीख पे… https://t.co/jzVpQqDQh3












Click it and Unblock the Notifications