'प्रत्येक भारतीयाच्या मनात राग'; सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध
pm narendra modi condemns attack on cji br gavai : सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात एका वकिलाने सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) रोजी बूट फेकण्याचा प्रयत्न केला अन् कोर्टरुमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने देशाच्या न्यायव्यवस्थेवर आघात झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांशी संवाद साधून या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांशी संवाद साधत या हल्ल्याबाबत आपला संताप व्यक्त केला.
निषेध: "आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतप्त आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. हे अत्यंत निंदनीय आहे," असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्या संयमाचे विशेष कौतुक केले. "अशा परिस्थितीत सरन्यायाधीश बीआर गवई यांनी दाखवलेल्या संयमाचे मी कौतुक करतो. हे न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Spoke to Chief Justice of India, Justice BR Gavai Ji. The attack on him earlier today in the Supreme Court premises has angered every Indian. There is no place for such reprehensible acts in our society. It is utterly condemnable.
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2025
I appreciated the calm displayed by Justice…
सर्वोच्च न्यायालयातील गोंधळ
सोमवारी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या न्यायालयात गोंधळ घातला. वकिलाने सरन्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांनी न्यायालयात घोषणाबाजीही केली. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ वकिलांच्या खटल्यांची सुनावणी करत असताना ही घटना घडली. गोंधळ घालणाऱ्या वकिलाने ओरडून सांगितले की, "आम्ही सनातनचा अपमान सहन करणार नाही." गोंधळ सुरू असतानाही सरन्यायाधीश गवई शांत राहिले आणि त्यांनी सुनावणी सुरू ठेवली. गोंधळानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित वकिलांना सांगितले की, "अशा कृतींमुळे आम्हाला कोणताही त्रास होत नाही आणि सुनावणी सुरूच राहील. न्यायालयाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये."
चौकशी आणि वकिलांचा निषेध
गोंधळ घालणाऱ्या वकिलाला लगेचच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना कोर्टरूममधून बाहेर काढले आणि सर्वोच्च न्यायालय संकुलातील डीसीपीच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर मुख्य न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, महासचिव आणि सुरक्षा प्रभारी यांच्याशी चर्चा केली.
वकील संघटनेचा निषेध: सर्वोच्च न्यायालयाच्या अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "आम्ही एका वकिलाच्या कृत्याबद्दल एकमताने आपला संताप व्यक्त करतो, ज्याने आपल्या अनुचित आणि बेशिस्त वर्तनाने भारताचे सरन्यायाधीश आणि त्यांच्या सहकारी न्यायाधीशांच्या पदाचा आणि अधिकाराचा अनादर करण्याचा प्रयत्न केला," असे असोसिएशनने म्हटले आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे.












Click it and Unblock the Notifications