पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल'ने सन्मानित करण्यात आले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार दिला आहे. पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी आणि मैत्री अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे. सेंट अँड्र्यू हे येशूचे पहिले प्रेषित आणि रशियाचे संरक्षक संत मानले जातात. त्यांच्या सन्मानार्थ, हा पुरस्कार पीटर द ग्रेटने 1698 साली सुरू केला. हा सन्मान सर्वात उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी गुणवत्तेसाठी दिला जातो.
#WATCH | Russian President Vladimir Putin confers Russia's highest civilian honour, Order of St Andrew the Apostle on Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/aBBJ2QAINF
— ANI (@ANI) July 9, 2024
भारत आणि रशिया यांच्यात विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त रणनीतीक करार तसेच भारत आणि रशियातील मैत्रीपूर्ण संबंधाला अधिक मजबूती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
12 एप्रिल रोजीच मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता, रशिया दौऱ्यात व्लादीमीर पुतीन यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणावेळी मोदी आणि पुतीन यांची गळाभेटही झाली.












Click it and Unblock the Notifications